Home » Blog » land scam unearthed : गोव्यात एक हजार कोटींचा जमीन घोटाळा

land scam unearthed : गोव्यात एक हजार कोटींचा जमीन घोटाळा

ईडीची छापेमारी, कागदपत्रे जप्त

by प्रतिनिधी
0 comments
land scam unearthed

नवी दिल्ली : गोव्यासारख्या जागतिक पर्यटन राज्यात अंमलबजावणी संचालनालयाने ईडीने मोठा जमीन घोटाळा उघडकीस आणला. सुमारे एक हजार कोटींचा हा घोटाळा आहे. या प्रकरणात बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीचे हस्तांतरण करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यावरून ईडीने गोव्यात अनेक ठिकाणी छापे टाकले. रोहन हरमलकर हा यातील प्रमुख सूत्रधार आहे. (land scam unearthed)

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर माहिती आणि त्यानंतरच्या आर्थिक तपासाच्या आधारे गुरुवार आणि शुक्रवारी (२४ आणि २५ एप्रिल) हे छापे टाकण्यात आले. रोहन हरमलकरचा यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.

ईडीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हरमलकर आणि इतर सहकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे तयार केली, तसेच महसूल नोंदींमध्ये छेडछाड केली या आधारे मूळ जमिनी मालकांच्या परस्परच या जमिनी बेकायदेशीरपणे हडपण्याचा मोठा कट रचला. (land scam unearthed)

विशेष म्हणजे, हरमलकरने २०२२ ची गोवा विधानसभा निवडणूक कुंभारजुआ मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती.

ईडीच्या मते, मूळ व्यक्ती आणि कुटुंबाच्या मालकीच्या या मालमत्ता त्यांच्या संमतीशिवाय बेकायदेशीरपणे विकल्या गेल्या होत्या. त्याचा मोठा फटका तसेच मानसिक त्रास या कुटुंबीयांना झाला. त्यानंतर ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, २००२ (पीएमएलए) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

‘‘छाननीत मालमत्तेची कागदपत्रे उघडकीस आली, ज्याचे सध्याचे बाजार मूल्य ₹१,००० कोटींपेक्षा जास्त आहे. यात बनावट मालकी हक्क कागदपत्रे आहेत. जमिनीच्या नोंदींमध्ये फेरफार करणे आणि बर्देझ तालुक्यातील अंजुना, अर्पोरा आणि असागोन सारख्या प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये लाखो चौरस मीटर पसरलेल्या जमिनीचे फसवे हस्तांतरण केल्याच्या बाबी उघड झाल्या आहेत. त्याची किंमत काही कोटीत आहे,’’ असे ईडीने म्हटले आहे. (land scam unearthed)

शोध कारवाईदरम्यान ईडीने ₹६०० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या स्थावर मालमत्तेची मूळ कागदपत्रे जप्त केली. गुन्ह्यातून मिळालेले पैसे विविध व्यक्ती आणि बेनामी संस्थांद्वारे लाँडरिंग केले गेले आणि शेवटी रिअल इस्टेट, लक्झरी वाहने आणि इतर उच्च-मूल्य असलेल्या मालमत्तेत गुंतवले गेल्याचे उघड झाले आहे.

पैशाचा माग शोधण्यासाठी, इतर लाभार्थी ओळखण्यासाठी आणि बेकायदेशीर मालमत्ता व्यवहारांच्या प्रक्रियेशी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांसह इतरांच्या भूमिका काय होत्या, याचा शोध घेण्यात येत असल्याचे ईडीने म्हटले आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00