Home » Blog » Seven dead: सात स्वच्छता कामगारांना चिरडले

Seven dead: सात स्वच्छता कामगारांना चिरडले

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर दुर्घटना

by प्रतिनिधी
0 comments
seven dead

नुह : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर शनिवारी (२६ एप्रिल) सकाळी एका भरधाव वेगाने येणाऱ्या मल्टी-युटिलिटी व्हॅनने सात स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले. सहा महिलासह सात स्वच्छता कामगार जागीच ठार झाले. चार जण गंभीर जखमी झाले. ( Seven dead)

नुह जिल्ह्यातील फिरोजपूर झिरका ब्लॉकमधील इब्राहिमवास गावातील खांब क्रमांक ७६ जवळ सकाळी १० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. हे सर्वजण रस्ता साफ करण्यासाठी थांबले होते. तेव्हा व्हॅनने वेगाने धडक दिली.( Seven dead)

गुलाब सिंगची पत्नी रेशम (६०), रामसिंगची पत्नी प्रेम (६०), रमेशची पत्नी रत्ना (४०), महेंद्रची पत्नी पिस्ता (३०), देशराजची पत्नी जयदेई (४०), राजूची पत्नी सत्यवती (३०) आणि आसीनचा मुलगा अस मोहम्मद (४५) अशी मृतांची नावे आहेत. आहे. मृतांपैकी सहा जण पिनांगवा परिसरातील खेरीकलन गावातील होते, तर अस मोहम्मद हा नुह जिल्ह्यातील झिमरावत गावातील रहिवासी होता.

जखमींपैकी चार महिलांची ओळख पटली असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना प्रगत उपचारांसाठी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले.

इब्राहिमवास गावातील सामाजिक कार्यकर्ते अन्सार खान यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या जवळच्या शेतातून रडण्याचा आवाज ऐकला आणि ते घटनास्थळी धावले. घटनास्थळी जाऊन पाहिले असताना  त्यांना एक्सप्रेसवेच्या एका बाजूला मृतदेह पडल्याचे आढळले. हे दृश्य थरकाप उडवणारे होते, असे ते म्हणाले. त्यांनी आपत्कालीन सेवांना बोलावले आणि रुग्णवाहिकांनी जखमींना रुग्णालयात नेले.

अपघातामुळे एक्सप्रेसवेवर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली.

उपायुक्त विश्राम मीना आणि पोलिस अधीक्षक राजेश कुमार यांनी घटनास्थळी भेट दिली आणि मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला. ( Seven dead)

प्रत्यक्षदर्शी आणि जखमींच्या जबाबांवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी नुह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तपासाचा भाग म्हणून अधिकाऱ्यांनी अपघातस्थळाजवळील कॅमेऱ्यांमधून सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा :
गुजरातेत सापडले हजारावर बांगला देशी
पहेलगाम हल्ल्याच्या ‘तटस्थ चौकशी’साठी तयार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00