Home » Blog » मोदी सरकारमधील मंत्र्यांचा राजीनामा

मोदी सरकारमधील मंत्र्यांचा राजीनामा

by प्रतिनिधी
0 comments
Resignation of a minister from the Modi government

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप एनडीए सरकारमधील केंद्रीय अल्पसंख्याक राज्य मंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्याकडे त्यांनी राजीनाम्याचे पत्र सोपवले असून त्यांचा राजीनामा मंजूर झाला असल्याचे राष्ट्रवादी भवनाने म्हटलं आहे. कुरियन यांच्या राजीनाम्यानंतर आणखी कुणी मंत्री राजीनामा देणार का याची चर्चा सुरू झाली आहे. मंत्रीमंडळात बदल आणि विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Resignation of a minister from the Modi government)

जॉर्ज कुरियन हे भाजपचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते असून ते केंद्रीय अल्पसंख्याक आणि मत्सपालन राज्यमंत्री होते. मोदी यांच्या तिसऱ्या मंत्रीमंडळात २०२४ पासून ते मंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांचा सहा वर्षाचा राज्यसभेचा कार्यकाल संपला होता. नुकत्याच झालेल्या केरळ विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्याने भाजप पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज होते अशी माहिती पुढे आली आहे. (Resignation of a minister from the Modi government)

जॉर्ज कुरियन भाजपच्या स्थापनेपासून म्हणजे १९८० पासून पक्षाचे सदस्य आहेत. सर्वोच्च न्यायालयातही त्यांनी वकिली केली आहे. नुकताच त्यांचा राज्यसभेचा कार्यकाल संपला असल्याने त्यांनी पद सोडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची जागा कोण घेणार याची चर्चा सुरू झाली आहे. (Resignation of a minister from the Modi government)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00