Home » Blog » भाजप एआयएमआयएम युती; भाजप दुतोंडी गांडूळ

भाजप एआयएमआयएम युती; भाजप दुतोंडी गांडूळ

by प्रतिनिधी
0 comments
BJP-AIMIM alliance

मुंबई : प्रतिनिधी : अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेसबरोबर तर अकोला जिल्हयातील अकोट नगरपालिकेत भाजपने एआयएमआयएम बरोबर युती केली आहे. या युतीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कडाडून टीका केली आहे. भाजप हा दुतोंडी गांडूळ असल्याचा घणाघात केला आहे. (BJP-AIMIM alliance)

खासदार संजय राऊत म्हणाले की, “भाजप दुतोंडी गांडूळ आहे. मीरा-भाईंदरमध्ये भाजपने एमआयएमला पाठिंबा दिला. तिथे फडणवीस आणि ओवेसी भाई-भाई झाल्याचे चित्र आहे. अंबरनाथमध्ये काँग्रेस-भाजप एकत्र आले. मीरा-भाईंदर, अंबरनाथमध्ये ओवेसी, काँग्रेस यांच्याबरोबर निकाह लागलेला आहे. मग आता भाजप हे हिरवे नाही का झाले? दुतोंडी गांडूळ त्या पद्धतीने भाजपचे राजकारण सुरु आहे. अशी टीका केली.  “मुस्लिम मतांसाठी एआयएमआयएम चा थेट पाठिंबा घेत आहात. अकोटपासून मीरा-भाईंदरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एआयएमआयएम सोबत भाजपची छुपी युती आहे. काही ठिकाणी उघड आहे.” असे म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडले. “काँग्रेसनेही भाजपसोबत युती केली हे चुकीचेच आहे. भाजपला भारत काँग्रेस मुक्त करायचा असतानाही त्यांनी युती केल्याचे आश्चर्य वाटते असेही ते म्हणाले.  (BJP-AIMIM alliance)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00