मुंबई : देशाचा इलेक्शन कमिशन हा निष्पक्ष राहिला नाही, तो भाजपचा इलेक्शन कमिशन आहे, असा जोरदार हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (१७ जुलै) केला. इलेक्शन कमिशन आणि भाजप हातात हात घेऊन काम करत आहेत. सर्व राज्यांत अशीच स्थिती आहे, असे ते म्हणाले. (Raut criticizes EC)
महाराष्ट्रात त्यांनी जे केले ते बिहारमध्ये करण्याचा त्यांचा डाव आहे. बिहारची निवडणूकच हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र तसे झाल्यास क्रांती होईल. बिहार ही क्रांतीची भूमी आहे. जेव्हा जेव्हा देशात क्रांती झाली ती महाराष्ट्र व बिहारमधून झाली आहे, असा इशाराही राऊत यांनी यावेळी दिला.
निवडणूक आयोग निष्पक्षपातीपणे निवडणुका पार पाडतो, अशी अपेक्षा आम्ही ठेवत होतो, पण तसे होत नाही. निवडणूक आयोग हे भाजपचे एक ऑफिस झाले आहे. तिथून भाजपला जे हवे ते केले जाते. जर एखाद्या पत्रकाराने जर निवडणूक आयोगाचा घोटाळा समोर आणला आहे. तर त्याच्यावर एफआयर करायची गरज नाही. त्याउलट त्याने जे काही समोर आणले आहे ते सुधारण्याची गरज नाही. या देशात आता ना लोकशाही आहे, ना व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अशी टीकाही त्यांनी केली. (Raut criticizes EC)
उद्धव ठाकरेंना वेणूगोपाल यांचा फोन
उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे सरचिटणीस वेणूगोपाल यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. उद्धव ठाकरे यांनी इंडिया ब्लॉकच्या बैठकीची मागणी केली होती. लोकसभेनंतर बैठक झाली नव्हती. त्यामुळे सर्वांची एकत्र बैठक घेऊन राष्ट्रीय राजकारणाबाबत एक भूमिका घेणे गरजेचे आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचे राऊत म्हणाले.
हेही वाचा :
महादेव मुंडेचं काय झालं?
निर्लज्ज, एहसान फरामोश… आदित्य यांचा शिंदेंवर हल्लाबोल