Home » Blog » Satara Kagal Highway : कागल – सातारा महामार्गाच्या कंत्राटादाराला मुश्रीफांकडून समज

Satara Kagal Highway : कागल – सातारा महामार्गाच्या कंत्राटादाराला मुश्रीफांकडून समज

by प्रतिनिधी
0 comments
Satara Kagal Highway

कोल्हापूर : प्रतिनिधी : सातारा ते कागल महामार्गावरील सहापदरीकरणाच्या कामाची प्रगती  १५ सप्टेंबर पर्यंत दिसून न आल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाई करुन काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. या राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरु असल्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या महामार्गाचे काम जलदगतीने करुन कामाची प्रगती दाखवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असे असा आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. (Satara Kagal Highway)

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले, जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण, कागल – राधानगरीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले तसेच कामगार विभाग व अन्य संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. (Satara Kagal Highway)

कागल – सातारा महामार्गाच्या कामाबाबत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी नॅशनल हायवे अथॉरिटीचे संजय कदम यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. यावेळी संजय कदम यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाबाबत दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत दिलेल्या सूचनांची माहिती दिली. तसेच १५ सप्टेंबर पर्यंत कामाची प्रगती न दिसल्यास संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश दिल्याची माहिती  कदम यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना दिली. प्रवाशांच्या सोयीचा विचार करुन हे काम अत्यंत जलद पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिल्या. (Satara Kagal Highway)

जिल्ह्यातील २९ प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतींच्या जमिनींची मोजणी करुन प्रकल्पग्रस्तांना आवश्यक त्या सुविधा वेळेत उपलब्ध करून द्या अशा सूचना देऊन मंत्री मुश्रीफ म्हणाले, मुरगुड येथील सर पिराजीराव तलावाच्या मागील बाजूला असलेल्या सांडव्यावर पूल बांधणे आवश्यक असून हा पूल बांधण्यात येणारे एमएसआयडीसीचे अधिकारी, या तलावाचे मालक व संबंधित अधिकाऱ्यांसोबत लवकरात लवकर बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (Satara Kagal Highway)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00