पत्नीची काळजी घेण्यासाठी त्याने रिटायरमेंट घेतली पण …

Rajasthan News

कोटा : पत्नीची प्रकृती बरी नसते म्हणून एका व्यक्तीने तिची काळजी घेण्यासाठी लवकर निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याने निवृत्ती घेतली. रिटायरमेंटच्या पार्टीत हे दाम्पत्य सहभागी झाले. पार्टी सुरू असताना अस्वस्थ वाटू लागल्याने ती खुर्चीवर बसली आणि जागेवरच गतप्राण झाली. राजस्थानमधील कोटा शहरात घडलेल्या घटनेचा हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Rajasthan News)

व्हिडिओमध्ये ती महिला तिच्या नवऱ्याच्या बाजूला हसताना दिसत आहे. मात्र, तिला अचानक चक्कर येते. ती खुर्चीवर बसते. त्यानंतर उपस्थितांनी तिला घेरल्याने ती टेबलावर कोसळली. तिला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. देवेंद्र चंदन यांनी पत्नी टीनाची काळजी घेण्यासाठी तीन वर्षे लवकर निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. टीना या हृदयरोगी होत्या.

हेही वाचा : 

Related posts

Temple's gold melted

Temple’s gold melted: तामिळनाडू सरकारने वितळवले मंदिरांचे सोने

Youthcongress protest

Youthcongress protest: गॅस दरवाढीविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर

BKU leader shot dead

BKU leader shot dead: भारतीय किसान युनियनच्या नेत्याची हत्या