Home » Blog » भैय्या मानेंचा मुश्रीफांना बाय बाय

भैय्या मानेंचा मुश्रीफांना बाय बाय

by प्रतिनिधी
0 comments
Bhaiyya Mane has parted ways with Mushrif

कोल्हापूर : प्रतिनिधी: महायुतीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे खंदे समर्थक आणि सेनापती अशी ओळख असलेल्या प्रताप उर्फ भैय्या माने यांनी मुश्रीफ यांची साथ सोडली. भैय्या माने सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यांनी महाविकास आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली आहे. ‘आजपासून माझा आणि भैय्या माने यांचा संबध संपला’ अशी थेट घोषणा मुश्रीफ यांनी करत महायुतीचा धर्म पाळणार असे स्पष्ट केले. (Bhaiyya Mane has parted ways with Mushrif)

मुश्रीफांनी केला होता भैय्या मानेंच्या उमेदवारीसाठी पाठपुरावा

मंडलिक गटातून राजकारणात सुरुवात झालेल्या भैय्या माने यांनी सदाशिवराव मंडलिक आणि हसन मुश्रीफ यांच्यात फारकत झाल्यानंतर मुश्रीफांची साथ धरली. गेली ४० वर्षे ते मुश्रीफांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. मुश्रीफ गटाचे सेनापती म्हणून ओळख असलेले भैय्या माने कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. त्यांनी यावेळी पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. ही जागा राष्ट्रवादीची आहे असा दावा करत मुश्रीफांनी भैय्या माने यांची उमेदवारीसाठी पाठपुरावा केला होता. (Bhaiyya Mane has parted ways with Mushrif)

माझ्या राजकीय भविष्याच्या आड येऊ नका

महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर भैय्या माने यांनी शनिवारी मुश्रीफांची भेट घेऊन ‘माझ्या राजकीय भविष्याच्या आड येऊ नका’ अशी विनंती करत निवडणूक लढण्याची घोषणा केली. त्यानंतर मुश्रीफांनी ‘आजपासून माझा आणि भैय्या मानेंचा संबंध संपला’ अशी घोषणा केली. त्यानंतर त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची घोषणा केली.

महाविकास आघाडीकडे मानेंचे प्रयत्न

भैय्या माने यांनी महाविकास आघाडीकडे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटांकडे जाण्याची शक्यता आहे. हर्षदा जाधव या उमेदवारीच्या प्रमुख दावेदार आहेत. त्या प्रभाकर देशमुख यांच्या कन्या आहेत. दरम्यान भाजपकडून शरद लाड यांना उमेदवारी मिळणार असे सांगितले जात असताना आता स्मिता योगेश जाधव यांच्या नावाची चर्चा भाजपकडून सुरू झाली आहे. त्या पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव यांच्या स्नुषा आणि कार्यकारी संपादक योगेश जाधव यांच्या पत्नी आहेत. तसेच स्वर्गीय  डॉ. डी.वाय.पाटील नात असून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या त्या भाची आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघातून विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांचे नाव आघाडीवर आहे. (Bhaiyya Mane has parted ways with Mushrif)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!