Home » Blog » विमान मुद्दाम खाली आदळून स्फोट घडवला; रोहित पवारांचा आरोप

विमान मुद्दाम खाली आदळून स्फोट घडवला; रोहित पवारांचा आरोप

by प्रतिनिधी
0 comments
Rohit Pawar accused of crashing the plane and causing an explosion

मुंबई : बारामतीच्या धावपट्टीवर उतरण्यासाठी दृश्यमान्यता कमी असतानाही पायलट सुमित कपूर यांनी माघारी न फिरत एक गिरकी घेऊन विमान खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. किंबहुना त्यांनी मुद्दामहून विमान खाली आदळले आणि स्फोट घडवून आणला, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला. अजित पवार यांच्या विमानाच्या अपघाताचा तपास संथ गतीने सुरू असून विमान कंपन्यांचे लागेबांधे मोठ्या नेत्यांशी असल्याने कंपनीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Rohit Pawar accused of crashing the plane and causing an explosion)

आमदार रोहित पवार यांनी आज अजित पवारांच्या विमान अपघातासंबधी दुसरी पत्रकार परिषद घेऊन हा अपघात नसून घात असल्याची शंका व्यक्त केली. विमानाची टाकी भरली असताना अतिरिक्त इंधन नेल्याने विमान पडल्याने स्फोट घडल्याचा आरोपही त्यांनी व्यक्त केला. ब्लॅकबॉक्सबाबत मी शंका उपस्थित केली होती आता ते खरे ठरले असून ब्लॅक बॉक्स जळाल्याचे आता सांगण्यात येत आहे. सर्वात महत्वाचे विमानात अतिरिक्त इंधन होते आणि इंधनाचे कॅनही विमानात होते. त्यामुळे विमानात स्फोट झाल्याचा आरोप त्यांनी केला. (Rohit Pawar accused of crashing the plane and causing an explosion)

मुंबईहून बारामतीसाठी जाण्यासाठी फार इंधनाची गरज नव्हती तरी अपघाताच्यावेळी विमानात तीन हजार ते साडेतीन हजार लिटर इंधन होते. तसेच विमानाच्या टॉयलेटजवळ इंधनाचे अतिरिक्त कॅनही ठेवले होते. पायलटचा वापर करुन अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते त्या विमानाचा अपघात घडवण्यात आला असा आरोप केला.

रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीला केंद्र सरकारमधील एक मंत्री पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे. व्हीएसआर कंपनीचे लागेबांधे केंद्रासह अन्य राज्यातील सरकारच्या मंत्र्याशी संबध असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. व्हीएसआर कंपनीचा मालक भारताबाहेर कसा पळाला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. (Rohit Pawar accused of crashing the plane and causing an explosion)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00