नागपूर : भारतीय संघाच्या प्रशिक्षण सहायक वर्गातील थ्रोडाउन तज्ज्ञ राघवेंद्र द्विवेदी उर्फ रघू याला नागपूर पोलिसांनी चाहता समजून हॉटेलबाहेर अडवले. नागपूरच्या रॅडिसन ब्लू हॉटेलबाहेर ही घटना घडली. गैरसमज दूर झाल्यानंतर त्याला संघासोबत हॉटेलमध्ये जाऊ देण्यात आले. (Raghu)
भारत-इंग्लंड वन-डे क्रिकेट मालिकेतील पहिला सामना ६ फेब्रुवारी रोजी नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाचे वास्तव्य रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आहे. रविवारी सायंकाळी सरावसत्र आटोपून भारतीय संघ हॉटेलवर परतला, तेव्हा रघूही संघासह हॉटेलमध्ये जाऊ लागला. परंतु, त्यावेळी हॉटेलबाहेर बंदोबस्तासाठी असणारे पोलिस त्याला चाहता समजले. त्यामुळे, हॉटेलबाहेरच त्याला अडवण्यात आले. त्याने पोलिसांना आपण संघाचा सहायक असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटे हा संवाद घडल्यानंतर अखेर पोलिसांना तो संघाचाच एक सदस्य असल्याची खात्री पटली व त्याला हॉटेलमध्ये सोडण्यात आले. (Raghu)
संघातील खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी हॉटेलबाहेर जमलेल्या क्रिकेटप्रेमींसमोरच हा प्रसंग घडला. त्यावेळी, चाहत्यांनीही पोलिसांना रघू हा प्रशिक्षक वर्गातीलच एक असल्याचे ओरडून सांगितले. हा सर्व प्रसंग चाहत्यांनी कॅमेऱ्यात कैद केला. तेव्हापासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रघू हा २०११ पासून थ्रोडाउन सहायक म्हणून भारतीय संघासोबत आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकरने त्याला भारतीय संघासोबत समाविष्ट केले होते. मागील वर्षी भारतीय संघाने १७ वर्षांनी टी-२० वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावण्यामध्येही रघूचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय फलंदाजांना वेगवान गोलंदाजी आणि विशेषत: उसळते चेंडू खेळण्याचा सराव करण्यासाठी रघू साहाय्य करतो. (Raghu)
GOAT Raghu of Indian cricket team was denied entry by Nagpur police 😂
Nagpur police guarding Rohit Sharma’s boys too strictly 😎 pic.twitter.com/iko9TTD0hP
— Ctrl C Ctrl Memes (@Ctrlmemes_) February 4, 2025
हेही वाचा :