नवी दिल्ली : Pushpa : The Rule – Part 2 बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई करत आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट कमाईचे नवे उच्चांक प्रस्थापित करीत आहे. तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला एक हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. २०२४ मध्ये भारतात एक हजार कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. तसेच २०२४ च्या अखेरपर्यंत किंवा २०२५ च्या सुरुवातीपर्यंत अन्य कोणताही चित्रपट हा विक्रम मोडण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे पुष्पा २ हा २०२४ मध्ये एक हजार कोटींचा आकडा गाठणारा एकमेव चित्रपट ठरला आहे. त्यासोबतच या चित्रपटाने आतापर्यंतच जवान, पठाण, एनिमल आणि स्त्री 2 यांसारख्या चित्रपटांच्या एकूण उत्पन्नालाही मागे टाकले आहे.
पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागाप्रमाणे त्याचा दुसरा भागही प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. सोशल मीडियावर त्याच्या गाण्यांनी धुमाकूळ घातला आहे. या सगळ्याचे प्रतिबिंब उत्पन्नाच्या आकड्यांमध्ये उमटलेले दिसून येते.
बॉक्स ऑफिस ट्रॅकर सैकनिल्कच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, सोळाव्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या शुक्रवारी पुष्पा २ ने १३.७५ कोटींची कमाई केली आहे. भारतातील एकूण कलेक्शन १००४.३५ कोटींवर पोहोचले आहे. त्यात तेलुगूमध्ये २९७.८ कोटी, हिंदीमध्ये ६३२.२६ कोटी, तमिळमध्ये ५२.८ कोटी, कन्नडमध्ये ७.१६ कोटी आणि मल्याळममध्ये १३.९९ कोटींची कमाई झाली आहे. जागतिक स्तरावर हा आकडा दीड हजार कोटींच्या पुढे गेला आहे.
Pushpa : The Rule – Part 2 या चित्रपटाने पहिल्या दिवशी १६४.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी ९३.८ कोटी, तिसऱ्या दिवशी ११९.२५ कोटी, चौथ्या दिवशी १४१.०५ कोटी, पाचव्या दिवशी ६४.४५ कोटी, सहाव्या दिवशी ५१.५५ कोटी, सातव्या दिवशी ४३.३५ कोटी, आठव्या दिवशी ३७.४५ कोटींसह पहिल्या आठवड्यात ७२५.८ कोटींची कमाई झाली.
नवव्या दिवशी ३६.४ कोटी, दहाव्या दिवशी ६३.३ कोटी, अकराव्या दिवशी ७६.६ कोटी, बाराव्या दिवशी २६.९५ कोटी, तेराव्या दिवशी २४.३५ कोटी, चौदाव्या दिवशी २०.५५ कोटी आणि पंधराव्या दिवशी १७.६५ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात एकूण २६४.८ कोटींचा आकडा गाठला आहे.
या आठवड्यातही अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तसेच ख्रिसमसच्या निमित्ताने वरुण धवनचा बेबी जॉन हा चित्रपट रिलीज होण्यास सज्ज आहे. त्यामुळे पुष्पा 2 च्या कमाईवर याचा कितपत परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :