आमदाराच्या मामांचे अपहरण करुन हत्या

पुणे; प्रतिनिधी : आमदारांच्या मामाचे अपहरण करुन त्यांची हत्या झाल्याची घटना पुण्यात घडली. अपहरण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेने पुणे परिसरात खळबळ उडाली आहे. पुण्यातील गुन्हेगारी वाढली असून त्यावर नियंत्रण ठेवण्यात पुणे पोलिस अपयशी ठरल्याची भावना पुणेकर व्यक्त करत आहेत. (Pune)

पुण्यातील विधानपरिषेदेचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचे अपहरण करुन खून करण्यात आला आहे, अशी माहिती  पोलिसांनी दिली आहे. योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे आज पुण्यातील सोलापूर मार्गावरील हॉटेल ब्ल्यु बेरी समोर थांबले होते. त्यांच्यासमोर एक कार थांबली आणि त्यातून काही व्यक्ती बाहेर आल्या. त्यांनी वाघ यांना पकडून कारमध्ये कोंबून अपहरण केले. त्यानंतर कार सोलापूरच्या दिशेने गेली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने वाघ यांचे अपहरण झाल्याची माहिती पुढे आली. पण आज सोमवारी सायंकाळी यवत गावाजवळ वाघ यांचा मृतदेह आढळला. पण वाघ यांचा खून का झाला याचे कारण कळालेले नाही. पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ