महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठी या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. गुलीगत धोका फेम सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता ठरला. या कार्यक्रमाने जरी निरोप घेतला असला तरी यातील सहभागी स्पर्धकांच्या अनेक बातम्या प्रसिध्दी माध्यमांतून चर्चेला येत असतात.आता कोल्हापूरचा डीपी दा अर्थात धनंजय पोवारला भेटायला यातील दोन स्पर्धक आल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Big Boss Marathi)
छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ शो संपल्यानंतर वैभव चव्हाण आणि इरिना रुडाकोवा या दोघांनी कोल्हापुरला येऊन धनंजय पोवार याची भेट घेतली. यासोबत वैभव, इरिनाने करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती.
सोशल मीडिया रिल्स स्टार धनंजय पोवारने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये वैभव, इरिना त्याला भेटण्यासाठी कोल्हापूर गाठल्याचे दिसत आहे. धनंजयला समोर पाहताच त्या दोघांनी त्याला कडकडून मिठी मारली.तसेच धनंजयच्या वडिलांचीही भेट घेतल्याचे दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. वैभव-इरिनाने सूरज चव्हाण ‘बिग बॉस मराठी’च्या या सीझनचा विजेता ठरल्यावरही त्याची भेट घेतली होती.
हेही वाचा :