chautala passes away: हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचे निधन

चंदीगढ : इंडियन नॅशनल लोक दलाचे प्रमुख आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला (वय ८९) यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या धक्क्याने गुरुग्राम येथे निधन झाले. माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांचे ते पुत्र होत. (chautala passes away)

चौटाला यांना अभय सिंह चौटाला आणि अजय सिंह चौटाला यांच्यासह तीन मुली आणि दोन मुले आहेत. ओम प्रकाश चौटाला यांच्या पत्नी स्नेह लता यांचे ऑगस्ट २०१९ मध्ये निधन झाले. अभय सिंह चौटाला हे हरियाणाच्या एलेनाबाद मतदारसंघाचे आमदार आहेत. ओम प्रकाश चौटाला यांचे नातू दुष्यंत चौटाला हे जननायक जनता पक्षाचे नेते आहेत. त्यांनी हरियाणाचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. हिसार मतदारसंघातून ते लोकसभेवरही निवडून गेले होते.(chautala passes away)

१६ वर्षे जुन्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात चौटाला यांना सीबीआयने चौटाला यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यावेळी ते ८७ वर्षांचे होते. दिल्लीतील तिहार तुरुंगातील ते सर्वांत वयस्कर कैदी ठरले होते.

यावर्षी ५ ऑक्टोबर रोजी झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान ओम प्रकाश चौटाला यांनी अखेरचे मतदान केले होते. सिरसाच्या चौटाला गावातील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले होते.

हेही वाचा : 

स्फोटांमागे स्फोट; किंकाळ्या नि ज्वाळात लपेटलेले लोक
५० हजार लाचेच्या मागणीप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यासह कॉन्स्टेबलवर गुन्हा

 

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली