वानखेडेवर भारताचा लाजिरवाणा पराभव

मुंबई : मुंबई कसोटीत न्यूझीलंडने भारताचा २५ धावांनी पराभव केला. या पराभवामुळे न्यूझीलंडने भारताला मालिकेत क्लीन स्वाईप दिला. यासह मालिकेतील सलग तीन पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत घसरण झाली आहे. गुणतालिकेत अव्वलस्थानी असणाऱ्या भारतीय संघाची दुसऱ्यास्थानी घसरण झाली आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने पहिल्या डावात २३५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव २६३ धावांवर संपला. भारताकडे २८ धावांची आघाडी होती. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा दुसरा डाव १७४ धावांवर आटोपला. भारतासमोर १४७ धावांचे लक्ष्य होते, मात्र भारतीय संघाचा दुसरा डाव १२१ धावांवरच आटोपला. भारताकडून ऋषभ पंतने दुसऱ्या डावात सर्वाधिक ६४ धावा केल्या, तर न्यूझीलंडकडून एजाज पटेलने सहा बळी घेतले.

न्यूझीलंडने १२ वर्षांनंतर भारताला घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावण्यास भाग पाडले. यासह घरच्या मैदानावर सलग १८ मालिका विजयांची मालिकाही खंडित केली. विशेष बाब म्हणजे न्यूझीलंडने ही कसोटी मालिका केन विल्यमसनशिवाय खेळली आहे. तसेच, टॉम लॅथमकडे प्रथमच किवी संघाची धुरा होती. दुसरीकडे, प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची ही अत्यंत खराब कामगिरी आहे. प्रशिक्षक झाल्यानंतर संघाची कामगिरी सातत्याने खराब होत आहे. बांगलादेशविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, मात्र संघाने लाजिरवाणी कामगिरी केली.

तीन किंवा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला क्लीन स्वीप करणारा न्यूझीलंड हा चौथा संघ आहे. याआधी इंग्लंडने भारताला चार वेळा, ऑस्ट्रेलियाने तीनवेळा आणि वेस्ट इंडिजने एकदा क्लीन स्वीप केले आहे. न्यूझीलंडने ४६ धावांचे लक्ष्य यशस्वीपणे राखले. भारतीय भूमीवर बचावलेली ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी केवळ एकदाच संघाने १५० पेक्षा कमी लक्ष्य वाचवले होते. २००४ मध्ये भारताने वानखेडेवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०७ धावांचा बचाव केला होता.

सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. संघाला १५ धावांवर पहिला धक्का बसला. आकाश दीपने डेव्हॉन कॉनवेला एलबीडब्ल्यू आऊट केले. यानंतर कर्णधार टॉम लॅथमने विल यंगसोबत ४४ धावांची भागीदारी केली. वॉशिंग्टन सुंदरने लॅथमला क्लीन बोल्ड करत भागीदारी फोडली. लॅथम २८ धावा करून बाद झाला. यानंतर सुंदरने रचिन रवींद्रलाही क्लीन बोल्ड केले. सुंदरने सलग तीन डावात तिसऱ्यांदा रचिनला बाद केले. रचिन बाद झाल्यानंतर यंगने डॅरिल मिशेलसोबत चौथ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी केली. यादरम्यान यंगने कसोटी कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावले.

ही भागीदारी रवींद्र जडेजाने मोडली. जडेजाने किवी डावाच्या ४४व्या षटकात दोन विकेट घेतल्या. त्याने प्रथम यंगला स्लिपमध्ये झेलबाद केले. त्यानंतर टॉम ब्लंडेल क्लीन बोल्ड झाला. यंगने ७१ धावांची खेळी खेळली. त्याचवेळी ब्लंडेलला खातेही उघडता आले नाही. यानंतर जडेजाने ग्लेन फिलिप्सलाही क्लीन बोल्ड केले. यानंतर जडेजाने ६१ व्या षटकात ईश सोधी आणि मॅट हेन्री यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. वॉशिंग्टन सुंदरने डॅरिल मिशेल आणि एजाज पटेल (७) यांना बाद करत न्यूझीलंडचा डाव २३५ धावांत गुंडाळला.

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला भारतीय संघाचा पहिला डाव २६३ धावांवर आटोपला. भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक ९० धावांची खेळी केली. शनिवारी सकाळी भारताने चार गड्यांच्या मोबदल्यात ८६ धावांवर खेळ सुरू केला आणि उर्वरित सहा विकेट गमावून १७७ धावा केल्या. शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी आक्रमक फलंदाजी करत धावफलक हलता ठेवला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. दरम्यान पंतने आपल्या कसोटी कारकिर्दीतील १३वे अर्धशतक तर गिलने सातवे अर्धशतक झळकावले. यानंतर ईश सोधीने त्याला बाद केले. तो ५९ चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६० धावा करून बाद झाला. यानंतर भारताचा डाव फसला.

एकेकाळी भारताची धावसंख्या चार विकेटवर १८० धावा होती आणि यात ८३ धावांचा भर घालताना टीम इंडियाने सहा विकेट गमावल्या. पंत बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा (१४) बाद झाला. तर, रविचंद्रन अश्विन (६) बाद झाला. शुभमन गिलने सर्वाधिक ९० धावांची खेळी केली. सर्फराज खान आणि आकाश दीप यांना खातेही उघडता आले नाही. वॉशिंग्टन सुंदरने ३८ धावा करून नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून एजाज पटेलने पाच विकेट घेतल्या. तर मॅट हेन्री, ग्लेन फिलिप्स आणि ईश सोधी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

आपल्या दुसऱ्या डावात न्यूझीलंडने १७४ धावा केल्या. विल्यम ओरूर्के दोन धावा करून नाबाद राहिला. विल यंगने दुसऱ्या डावात सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली. त्यांच्याशिवाय कॉनवेने (२२), मिशेलने (२१), आणि फिलिप्सने (२६) धावा केल्या. उर्वरित चार फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. रचिन रवींद्र, टॉम ब्लंडेल चार तर, ईश सोधी आठ आणि कर्णधार टॉम लॅथम एक धावा करून बाद झाला. भारताकडून जडेजाने पाच, तर अश्विनने तीन विकेट घेतल्या. तर आकाश दीप आणि सुंदरला प्रत्येकी एक विकेट मिळाली. जडेजानेही पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या होत्या. या कसोटीत त्याने एकूण १० विकेट घेतल्या.

दुसऱ्या डावात भारताची टॉप ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप ठरली. रोहित शर्मा (११), शुभमन गिल (१), विराट कोहली (१), यशस्वी जैस्वाल (५) आणि सर्फराज खान (१) पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर पंतने रवींद्र जडेजासोबत सहाव्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली. जडेजा सहा धावा करून बाद झाला. पंत ६४ धावा करून बाद झाला. यानंतर भारताचा डाव गडगडला. रविचंद्रन अश्विन आठ धावा करून बाद झाला, वॉशिंग्टन सुंदर १२ धावा करून बाद झाला. तर, आकाश दीपला खातेही उघडता आले नाही. न्यूझीलंडकडून एजाज पटेलने सहा, ग्लेन फिलिप्सने तीन आणि मॅट हेन्रीने एक विकेट घेतली.

भारताची विजयी घौडदौड खंडित

मुंबई कसोटीतील विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा पराभव केला. मायदेशात झालेल्या दोन किंवा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला दुसऱ्यांदा क्लीन स्वीप मिळाला आहे. यापूर्वी फेब्रुवारी २००० साली दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या मालिकेत भारताचा २-० असा पराभव केला होता. त्याचबरोबर घरच्या मैदानावर तीन किंवा त्याहून अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला प्रथमच क्लीन स्वीप मिळाला आहे. ही कामगिरी करत न्यूझीलंडने इतिहास रचला. त्यांनी भारतात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत टीम इंडियाला क्लीन स्वीप दिला.

Related posts

Mohammed Shami : शमीचा समावेश अद्याप दूरच

Tanush Kotian : तनुष कोटियनला ऑस्ट्रेलियाचे तिकीट?

Vinod Kambli : विनोद कांबळीची प्रकृती खालावली