Home » Blog » अयोध्या राममंदिरातील दानपेटीतील रक्कमेचा कोट्यवधीचा अपहार?

अयोध्या राममंदिरातील दानपेटीतील रक्कमेचा कोट्यवधीचा अपहार?

by प्रतिनिधी
0 comments
Misappropriation of funds from the Ram Mandir donation box

नवी दिल्ली : तमाम भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्यातील राममंदिरातील दानपेट्यामध्ये भाविकांनी अर्पण केलेल्या रक्कमेमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा माहिती पुढे आली आहे. गुप्त सीसीटीव्हीमुळे हा प्रकार उघडकीस आला असून एका दोषी कर्मचाऱ्यांकडून पाच लाख रुपये हस्तगत केले आहेत. उत्तरप्रदेशातील समाजावादी पक्षाचे नेते खासदार अखिलेश यादव यांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार असून त्यापूर्वी राम मंदिरातील दानपेटी गैरव्यवहारांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चालू केल्या आहेत. (Ram Mandir donation fraud)

अयोध्यातील नव्याने बांधलेल्या श्रीराम मंदिराचे संचलन श्रीरामजन्मभूमी तीन ट्रस्ट करत आहेत. ट्रस्टने राम मंदिरासह संपूर्ण दर्शन मार्गावर चार डझन म्हणजेच ४८ दानपेट्या ठेवल्या आहेत. या पैशाची मोजणी करण्याठी स्टेट बँक ऑफ इंडियाला अधिकृत केले आहे. बँकेने या कामांसाठी एक खासगी एजन्सी नियुक्ती केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पैशाच्या मोजणीत हेराफेरी होत असल्याची शंका आली. त्यानंतर तिथे छुपा कॅमेरा लावला आहे. शुक्रवारी ५ जून रोजी एका कर्मचाऱ्याची चोरी पकडली गेली. पोलिसांनी संशयित कर्मचारी अविनाश शुक्ल त्यांच्या चार ते पाच साथीदारांची चौकशी सुरू केली. अविनाशने चोरीची रक्कम त्यांच्या स्वत:च्या खात्यात जमा केल्याचे सांगितले. त्याच्या खात्यातील पाच लाख रुपये पुन्हा ट्रस्टच्या खात्यात जमा केले आहेत. यापूर्वी कर्मचाऱ्यांनी किती पैसे चोरले याची मोजदाद नसल्याने ही रक्कम कोट्यवधीत असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. (Ram Mandir donation fraud)

अखिल यादवांकडून न्यायालयीन चौकशीची मागणी

सपाचे खासदार अखिलेश यादव यांनी एक्सवर पोस्ट करुन उत्तरप्रदेशातील योगी सरकावर निशाना साधला आहे. एक्स पोस्टमध्ये असे म्हटले आहे की. संपूर्ण जगातील प्रभू रामाच्या भक्तांसाठी ही अत्यंत संवेदनशील आणि धक्कादायक बातमी आहे. राम मंदिरातील चढाव्याची कोट्यवधीची रक्कम गायब झाल्याचे समोर आले आहे. मंदिर ट्रस्टसाठी ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून त्यावर कोणीही स्पष्टीकरण देण्यास पुढे येत नाही. या प्रकरणी सरकारने बाळगलेली गुप्ता संशयास्पद असून सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून याची दखल घ्यावी.

श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून सारवासारव

 गेले तीन दिवस अयोध्येत चोरीची घटनेची चर्चा सुरूअसताना मंदिराच्या ट्रस्टने मौन बाळगले होते. मंदिराचे व्यवस्थापक गोपाळ राव आणि सुरक्षा प्रमुख बलरामचारी दुबे यांनी अशा कोणत्याही घटना घडली नसल्याचे सांगत या अफवा आहेत असे म्हटले होते. पण अफवांचे पीक वाढल्याने श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी अधिकृत पत्रक काढत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे एकाचवेळी अंतर्गत ऑडिट केले जाते. यामध्ये ट्रस्ट आणि बँकेचे कर्मचारी सहभागी असतात. हे ऑडिट असनेक दिवस चालते. सध्या ऑडिटचे काम सुरू आहे. आतापर्यंत कोणतीही मोठी किंवा उल्लेखनीय बाब समोर आलेली नाही. पण दुसरीकडे एका कर्मचाऱ्यांकडून पाच लाख रुपये परत घेण्यात आल्याने ट्रस्टच्या अंतर्गत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Ram Mandir donation fraud)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00