Home » Blog » रवीना टंडनच्या आईच्या घरी ८५ लाखांची चोरी; महिलेला अटक

रवीना टंडनच्या आईच्या घरी ८५ लाखांची चोरी; महिलेला अटक

by प्रतिनिधी
0 comments
Theft worth ₹85 Lakhs at Raveena Tandon's Mother's Home

मुंबई : प्रतिनिधी : बॉलिवूडची अभिनेत्री रवीना टंडनची आई वीणा टंडन यांच्या घरी ८५ लाखांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. पोलिसांनी खार येथील राशी छाब्रिया यांना अटक केली आहे. अटक केलेली महिला टंडन कुटुंबाच्या जवळची असून वीणा टंडन यांची त्या देखभालही करत होत्या अशी माहिती पुढे आली आहे.

रवीना टंडन यांचे बंधू चित्रपट निर्माते राजीव टंडन यांनी फिर्याद दिली आहे. ते जुहू येथील एका सोसायटीतील त्यांच्या टंडन हाऊस मध्ये राहतात. टंडन यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. तक्रारीत असे म्हटले आहे की २०२४ मध्ये त्यांच्या घराचे नुतनीकरणाचे काम सुरू होते. त्या काळात घरातील मौल्यवान वस्तू बहीण रवीना टंडन यांच्या घरी हलवण्यात आल्या होत्या. मात्र आई वीणा टंडन यांचे सोन्या चांदीचे दागिने दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीतील तिजोरीत सुरक्षित ठेवण्यात आले होते. ही तिजोरी राजीव टंडन यांच्या बेडरुम लागून असलेल्या एका कपाटात ठेवण्यात आली होती. (Theft worth ₹85 Lakhs at Raveena Tandon’s Mother’s Home)

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दसऱ्याच्यावेळी जेव्हा कुटुंबाने दागिने तपासले तेव्हा तिजोरी लुटण्यात आल्याचे निदर्शनास आले. अनेक मौल्यवान वस्तू गायब होत्या. दोन महागडी घड्याळेही गायब होती. त्यांच्या घरात निवडक माणसे असताना आणि पाहुण्याची संख्या मर्यादीत असताना चोरी कशी झाली याचा शोध घेण्यास सुरुवात झाली. या खोलीत फक्त निवडक व्यक्तीच जात होत्या. दागिने गायब झाल्यानंतर वीणा टंडन यांच्या देखभालीची बरीच वर्षे जबाबदारी सांभाळणाऱ्या राशी छाब्रिया यांच्यावर संशय बळावला. त्यांनी तिच्याकडे विचारणा केली असता आपल्याला माहित नसल्याचे सांगितले. त्यानंतर टंडन कुटुंबियाने पोलिसांकडे जाणाऱ्या निर्णय घेतल्यावर राशी छाब्रियाने तिजोरी फोडून दागिने आणि घड्याळे चोरल्याची कबुली दिली. (Theft worth ₹85 Lakhs at Raveena Tandon’s Mother’s Home)

या गुन्ह्याचा तपास करण्याऱ्या जुहू पोलिसांनी अशी माहिती दिली की, राशी छाब्रियाने सुरवातीला चोरलेली दोन घड्याळे टंडन कुटुंबाला परत केली. पण दागिने जगदीश नावाच्या व्यक्तीला दिल्याचे सांगितले. तसेच दागिने परत देण्याचे आश्वासनही राशीने दिले. पण बरेच दिवस दागिने परत न दिल्याने तिच्याकडे विचारणी केली असता राशी छाब्रियाने एका साथीदारामार्फत राजीव टंडन यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. तसेच एका खोट्या ड्रग्ज प्रकरणात गोवण्याची धमकी दिली. राशी छाब्रियाकडून दागिने परत मिळणार नाही याची खात्री पटल्यानंतर राजीव टंडन यांनी जुहू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी १९ मे रोजी राशीला अटक केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार सोन्याच्या बांगड्या, ब्रेसलेट्स, नेकलेस, लॉकेटस् , अंगठ्या, कानतले दागिने, हिऱ्यांनी जडवलेले मंगळसुत्र अशा मौल्यवान दागिने चोरल्याचा आरोप राशी छाब्रियावर ठेवण्यात आला आहे. (Theft worth ₹85 Lakhs at Raveena Tandon’s Mother’s Home)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00