Home » Blog » फोटो,व्हिडिओ व्हायरलची भिती दाखवून चौघांचा युवतीवर दहा महिने अत्याचार

फोटो,व्हिडिओ व्हायरलची भिती दाखवून चौघांचा युवतीवर दहा महिने अत्याचार

by प्रतिनिधी
0 comments
Four men sexually assault young woman

कोल्हापूर : प्रतिनिधी : फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत चौघा तरुणांनी महाविद्यालयीन युवतीवर  दहा महिने वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरुन गेला आहे. पुलाची शिरोलीतील लव्ह जिहाद प्रकरणानंतर राधानगरी, कागल, मुरगुड परिसरात घडलेल्या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. अत्याचारग्रस्त १९ वर्षीय युवतीने मुरगुड पोलिस ठाण्यात संशयित चौघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

आदित्य बाजीराव शेटके (वय २४, रा. खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी), रणजित संभाजी मुधोळकर (वय २९, रा. सोळांकूर, ता. राधानगरी), प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर (वय २४, रा. राधानगरी) आणि विक्रम रामचंद्र पाटील (वय २२, रा. बुजवडे, ता. राधानगरी) अशी संशयितांची नावे आहेत. (Four men sexually assault young woman)

मुरगुड पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली. या गुन्ह्यातील मुख्य संशयित अदित्य शेटके यांची पिडीत तरुणीशी ओळखपत्र तयार करुन देण्याच्या बहाण्याने ओळख वाढवली.  ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने अदित्यने त्या तरुणीला मुदाळतिट्टा येथे बोलावून घेतले. त्यानंतर संबधीत युवतीला मुरगुड येथील तलाव परिसरात झुडपात नेले. तिथे तरुणीचे फोटो काढून एडिट केले. ते फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. (Four men sexually assault young woman)

अदित्यने युवतीला गिरगाव येथील लॉजवर नेत फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला. तसेच गिरगावातील लॉजवर व्हिडिओ शूटिंग केले. त्यानंतर अदित्यने संबधित युवतीला वेळोवेळी मित्रांशी बोलायला सांगितले. अदित्यचे मित्र रणजीत मुधोळकर, प्रणवगिरी पालकर, विक्रम पाटील यांनी पिडीत युवतीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर गिरगाव, कात्यायणी, कोल्हापूर आणि पाचगाव येथील लॉजवर नेऊन अनेकवेळा बळजबळीने शारीरिक संबध ठेवले. (Four men sexually assault young woman)

१५ मे रोजी चौघांनी युवतीवर अत्याचार केल्यानंतर अदित्य शेटके, रणजीत मुधोळकर, प्रणवगिरी पालकर यांनी फोटो आणि व्हिडिओ डिलिट करण्यासाठी मोठ्या रक्कमेची मागणी केली. संबधित युवतीने पैसे दिल्यानंतर लग्न झाल्याशिवाय फोटो आणि व्हिडिओ डिलिट करणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर संबधित युवतीने त्यानंतर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी चौघांना अटक केली. (Four men sexually assault young woman)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00