Mystery Volcano: दोनशे वर्षांनी उकलले गूढ

Volcano

वॉशिंग्टन : पृथ्वीचे वातावरण कशामुळे थंड झाले, याचे गूढ होते. ते शास्त्रज्ञांना उलगडले. एका शक्तिशाली ज्वालामुखीच्या उद्रेकाने पृथ्वीचे हवामान थंड झाले. मात्र या ज्वालामुखीचा उद्रेक कुठे झाला होता याचे कोडे शास्त्रज्ञांना उलगडले नव्हते. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यापासून (१८३१) सुमारे दोनशे वर्षांनी त्याचे गूढ उकलण्यात यश आले आहे. तो आहे दुर्गम कुरील बेटांतील झावरितस्की ज्वालामुखी. १९ व्या शतकातील सर्वांत शक्तिशाली ज्वालामुखी म्हणून तो आता ओळखला गेला आहे. (Mystery Volcano)

‘प्रोसीडिंग्ज ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. कुरिल बेटांवर या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. ते जपान आणि कामचतका दरम्यानच्या अत्यंत दुर्गम परिसरात ते आहे. रशिया आणि जपानदरम्यानचा वादग्रस्त भाग म्हणून याची ओळख आहे. आणि या उद्रेकाचा उगम जपान आहे.(Mystery Volcano)

तप्त पृथ्वीचे वातावर थंड करणाऱ्या शक्तिशाली ज्वालामुखीच्या उद्रेकाचे वर्ष शास्त्रज्ञांनी शोधले होते. मात्र तो नेमका कुठे झाला याबाबतचे रहस्य मात्र सुमारे दोनशे वर्ष उलगडले नव्हते. या उद्रेकामुळे उत्तर गोलार्धातील तापमान १° सेल्सियस (1.8°F) ने कमी झाले. त्याचा परिणाम म्हणून थंड आणि कोरडे वातावरण निर्माण झाले.(Mystery Volcano)

हे कोडे सुटले कसे?

संशोधकांनी ग्रीनलँडमधील बर्फाच्या मध्यावरील भागाचा अभ्यास करून हे कोडे सोडवले. त्यात राख, ज्वालामुखीचा काचेसारखा थर आणि सल्फर समस्थानिकांचे (sulfur isotopes) थर सापडले. १८३१ मध्ये निर्माण झालेले हे थर आहेत. ग्रीनलँडमध्ये सल्फरचे प्रमाण अंटार्क्टिकाच्या तुलनेत ६.५ पट जास्त असल्याचे आढळून आले.

भू-रासायनिक विश्लेषण, किरणोत्सर्गी डेटिंग आणि संगणक मॉडेलिंग यांसारख्या प्रगत तंत्रांचा वापर करून शास्त्रज्ञांनी या ज्वालामुखीतील महत्त्वाचे दुवे शोधले. कुरिल ज्वालामुखीचा अभ्यास केलेल्या इतरांनी दिलेले नमुने झावरितस्की कॅल्डेराशी जुळले. इंडोनेशियातील माऊंट टँबोरा (१८१५) आणि निकाराग्वामधील कोसेगुइना (१८३५) बरोबरच झावरितस्कीचा उद्रेक आता १९व्या शतकातील सर्वांत शक्तिशाली म्हणून ओळखला जातो.

हेही वाचा :

हॅलो, मी अंतराळात पोहोचलोय!

अंतराळ अर्थव्यवस्थेचा बाजार बहरणार

 

Related posts

Badminton : छत गळतीमुळे प्रणॉयचा सामना थांबवला

Mukherjee Memorial : प्रणव मुखर्जींच्या स्मारकासाठी जागा निश्चित

Delhi Election : दिल्लीचा बिगुल वाजला