Home » Blog » Murder at Sadale madale : पतीने केला पत्नीचा खून

Murder at Sadale madale : पतीने केला पत्नीचा खून

by प्रतिनिधी
0 comments

कोल्हापूर : प्रतिनिधी : पतीच्या अनैतिक संबधाला विरोध केल्याने पतीने पत्नीचा काटा काढला. जोतिबा दर्शनासाठी पत्नीला घेऊन जाणाऱ्या पतीने सादळे मादळे घाटात चाकूने वार करुन पत्नीचा खून केला. त्यानंतर तो स्वत: सोलापूर पोलिस ठाण्यात हजर राहिला. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद झाला आहे. (Murder at Sadale madale)

सचिन रजपूत हा मुळचा सोलापूरचा असून त्याची पत्नी शुभांगी रजपूत ही गडहिंग्लज तालुक्यातील निलजी गावची आहे. सचिन हा सोलापूर येथे सुपरवायझरची नोकरी करत होता. सोलापूरमधील महिलेशी त्याचे अनैतिक संबध असल्याची माहिती मिळाल्यावर पत्नी शुभांगी माहेरी निलजी येथे आली. अनैतिक संबधावरुन सचिन आणि शुभांगी यांच्यात वाद सुरू होते.  दीड वर्षापासून ती निलजीत आई वडिलांसोबत रहात होता. दरम्यान पत्नीला नेण्यासाठी दीड महिन्यापूर्वी सचिन निलजी येथे आला. सोलापूर येथील नोकरी सोडली असून शिरोली एमआयडीसीमध्ये एका कंपनीत सुपरवायझरची नोकरी लागली असल्याचे त्याने शुभांगीला सांगितले. शुभांगीची माहेरच्या नातलगांची त्याने समजूत काढली. त्यानंतर सचिन आणि शुभांगी यांनी शिरोली एमआयडीसीजवळील रामनगर शिये फाटा येथे गेल्या दीड महिन्यापासून खोली घेऊन रहात होते. त्यांना चार वर्षाचा मुलगा आहे. (Murder at Sadale madale)

गुरुवारी सायंकाळी सचिन आणि शुभांगी दोघेही मोटारसायकलवरुन जोतिबा डोंगरावर देवदर्शनासाठी गेले. देवदर्शन करुन ते घराकडे परत येत असताना त्याने कासारवाडी गावच्या हद्दीत सादळे मादळे घाटात वन खात्याच्या जागेत एका ठिकाणी ते बोलत बसले होते. त्यानंतर सचिनने शुभांगीला चाकूने भोसकून खून केला आणि पळून गेला. दरम्यान शुक्रवारी सादळेमादळे घाटात खून झाल्याची माहिती पोलिसांना कळवली. शिरोली एमआयडीसीचे पोलिस घटनास्थळी आले. पंचनामा करुन त्यांनी मृतदेह सीपीआर हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमला पाठवला. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.बी. कोळी तपास करत आहेत. दरम्यान या गुन्ह्यातील संशयित शुभांगीचा पती सचिन रजपूत स्वत: सोलापूर पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. (Murder at Sadale madale)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00