कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यात महानगरपालिका निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येत असताना सर्वच राजकीय पक्षाच्या आघाड्या, युतीचा घोळात घोळ सुरू असताना काँग्रेस पक्षाने कोल्हापूर आणि सोलापूरच्या उमेदवारांची यादी जाहीर करुन बाजी मारली आहे. कोल्हापुर महानगरपालिकेसाठी काँग्रेसने तब्बल ४८ उमेदवारांची तर सोलापूरमध्ये २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. (Congress announces its list for Kolhapur and Solapur)
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, खासदार शाहू छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारांची यादीला प्रदेश काँग्रेस कमिटीने हिरवा कंदील दाखवला. ४८ उमेदवारांमध्ये २९ नवीन चेहरे आहेत. १६ माजी नगरसेवकांवर विश्वास दाखवला आहे. महायुतीतील शिवसेना वगळून ही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. माजी नगरसेवकांच्या तीन कुटुंबातील घरातील दोघांना उमेदवारी जाहीर केली आहे. माजी नगरसेविका इंद्रजीत बोंद्रे आणि त्यांची पत्नी मयूरी बोंद्रे, माजी नगरसेवक राहूल माने आणि त्यांची पत्नी ऋग्वेदा माने, माजी उपमहापौर भूपाल शेटे आणि त्यांची मुलगी पूजा शेटे यांना वेगवेगळ्या प्रभागात उमेदवारी दिली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी नगरसेवक राजेश लाटकर यांनाही उमेदवारी दिली आहे. माजी उपमहापौर प्रकाश पाटील, अर्जुन माने, माजी नगरसेवक संजय मोहिते, प्रताप जाधव, मधुकर रामाणे, ईश्वर परमार, विनायक फाळके, प्रविण केसरकर, दीपा मगदूम, जयश्री चव्हाण, उमा बनछोडे, जयश्री चव्हाण, मनसे जिल्हा प्रमुख राजू दिंडोर्ले यांनाही उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. (Congress announces its list for Kolhapur and Solapur)
सोलापूर महानगरपालिकेसाठी २० उमेदवारांची पहिली यादी प्रदेश कार्यालयातून शनिवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये ६ अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांचा समावेश आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन दिवसापूर्वी राज्य निवड मंडळाच्या बैठकीत उमेदवार निश्चित करण्यात आले होते
अधिकृत उमेदवाराचे नाव : प्रभाग क्र९: अ:दत्तु नागया बंदपट्टे, प्रभाग क्र.११ ड) धीडष्णा गोविंदपा तोरगणी. प्रभाग क्र.१४: ब) शोएब अनिसुर रहमान महागामी, ड) बागवान खलिफा नसीम अहमद बशीर अहमद . प्रभाग १५) ब) सबा परवीन आरिफ शेख, क) चेतन पंडित नरोटे, ड) मनिष नितीन व्यवहारे प्रभाग क्र.१६: ब) फिरदौस मौलाली पटेल, क) सी सीमा मनोज बलगुलवार,
मुंबई महापालिकेसाठी समाजवादी पक्षाची पहिली उमेदवार यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांनी ही यादी जाहीर केली आहे. समाजवादी पक्ष मुंबईत स्वबळावर लढणार असून सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे पक्षाचे महासचिव मेराज सिद्दिकी म्हणाले. (Congress announces its list for Kolhapur and Solapur)