Home » Blog » Trump slams Musk: मस्कना वेड लागलंय…: ट्रम्प

Trump slams Musk: मस्कना वेड लागलंय…: ट्रम्प

by प्रतिनिधी
0 comments
Trump slams Musk

वॉशिंग्टन : अब्जाधीश एलन मस्क यांच्याशी झालेल्या सार्वजनिक वादानंतर त्यांच्याशी बोलण्यात रस नाही, त्यांना वेड लागलंय, अशी जहरी टीका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (६ जून) केली. (Trump slams Musk)

एबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, एका वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने ट्रम्प यांना काही माध्यमांच्या वृत्तांचा आधार घेत तुम्ही मस्क यांच्याशी फोनवर बोलणार आहात का, असे विचारले तेव्हा ट्रम्प म्हणाले, ‘‘तुम्हाला तो माणूस म्हणायचे आहे का की जो वेडा झाला आहे?’’ असे सांगून ते म्हणाले की, सध्या त्यांच्याशी बोलतण्यात ‘‘विशेष रस नाही.’’

मस्क त्यांच्याशी बोलू इच्छितात, परंतु ते मस्कशी बोलण्यास तयार नाहीत, असेही ते म्हणाले.(Trump slams Musk)

ट्रम्प यांच्या मुख्य देशांतर्गत धोरणांपैकी एकावर मस्क यांनी टीका केली. त्यानंतर दोघांनीही एकमेकांवर टीका केली. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मस्क यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

दोन्ही अब्जाधीशांनी गुरुवारी या वादात आणखी तेल ओतले. त्यांच्या मालकीच्या सोशल मीडिया साइट्सवर एकमेकांवर टीका केली. त्यामुळे हे दोघे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता मावळली.

मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर ‘कृतघ्नते’चा आरोप केला आणि म्हटले की, मी नसतो तर ट्रम्प निवडणूक हरले असते.(Trump slams Musk)

ट्रम्प यांच्या ‘‘महत्त्वाकांक्षी खर्च विधेयका’’विरुद्ध मस्कने अनेक आठवड्यांपासून लॉबिंग केले होते. मात्र ट्रम्प आणि त्यांचे एकेकाळी सहयोगी मस्क यांच्यातील संबंध तुटले. गेल्या महिन्यात अमेरिकन हाऊसने मंजूर केलेल्या आणि सिनेटमध्ये मतदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या या विधेयकाविरुद्ध मस्क यांनी अनेक आठवड्यांपासून लॉबिंग केले होते.

सरकारी कार्यक्षमता विभाग (डोज) सोडल्याच्या काही काही काळानंतर मस्क यांनी त्यांच्या साइट X वर जाऊन विधेयकाला ‘घृणास्पद’ म्हटले. तसेच ‘‘”ज्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केले त्यांना लाज वाटली पाहिजे : तुम्हाला माहिती आहे की तुम्ही चुकीचे केले आहे,’’ अशी पोस्ट केली. हे विधेयक बेजबाबदारपणे मांडले आहे. ते अमेरिकेच्या राष्ट्रीय कर्जात भर घालेल, असा युक्तिवाद केला. त्यांच्या अनुयायांना खर्च योजनेला विरोध करण्यासाठी त्यांच्या प्रतिनिधींना फोन करण्यास प्रोत्साहित केले.

हेही वाचा :
चौकडीमुळे जगाची ‘‘इको सिस्टीम’’ धोक्यात

You may also like

error: Content is protected !!