Mukherjee Memorial : प्रणव मुखर्जींच्या स्मारकासाठी जागा निश्चित

Mukherjee Memorial

Mukherjee Memorial

नवी दिल्ली : दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्मारकासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय स्मृती स्थळ येथे जागा निश्चित केली आहे. मुखर्जी यांचे ऑगस्ट २०२० मध्ये निधन झाले आहे. (Mukherjee Memorial)

मुखर्जी यांच्या कन्या आणि काँग्रेसच्या माजी नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी मंगळवारी (७ जानेवारी) रोजी यासंबंधीचे पत्र ‘एक्स’वर पोस्ट केले. जे त्यांना गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या भूमी आणि विकास कार्यालयाचे हे पत्र आहे. त्यात त्यांना या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. (Mukherjee Memorial)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतिस्थळासाठी सरकारने अद्याप घोषणा केलेली नाही, या पार्श्वभूमीवर हे वृत्त समोर आले आहे.

‘सक्षम प्राधिकरणाने भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांचे स्मारक उभारण्यासाठी ‘राष्ट्रीय स्मृती’ संकुलात (राजघाट परिसर) एक जागा निश्चित करण्यास मान्यता दिली आहे,’ या पत्रात म्हटले आहे. (Mukherjee Memorial)

या निर्णयाबद्दल शर्मिष्ठा मुखर्जी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले. ‘आम्ही न मागणी करता बाबांच्या स्मारकासाठी सरकारने जागा घोषित केली त्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही. पंतप्रधानांच्या या दयाळूभावामुळे मी खूपच प्रभावित झाले. बाबा नेहमी म्हणत की, देशाकडून कधीही सन्मान मागितला जाऊ नये, तो मिळाला पाहिजे.  मी कृतज्ञ आहे,’ अशा भावना त्यांनी ‘एक्स’वर व्यक्त केल्या आहे.

हेही वाचा :
दिल्लीचा बिगुल वाजला

Related posts

India’s major decisions

India’s major decisions: सिंधू करार स्थगित, अटारी चेक पोस्ट बंद

Luxury Goods

Luxury Goods : महागड्या वस्तू घेताय?… १% टीसीएस लागू

Rajnath

Rajnath : आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू