Home » Blog » निवडणूक आयोगाच्या डोळ्यात गारगोट्या आहेत? : संजय राऊत

निवडणूक आयोगाच्या डोळ्यात गारगोट्या आहेत? : संजय राऊत

by प्रतिनिधी
0 comments
MP Raut criticizes the Election Commission

मुंबई : प्रतिनिधी : राज्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या बिनविरोध निवडणुकांवरुन विरोधी पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी निवडणूक आयोगाच्या डोळ्याच्या खाचा झाल्या आहेत का?  त्यांच्या डोळ्यांत गारगोट्या आहेत? असा सवालही केला. (Sanjay Raut, State Election Commission, Rahul Narvekar)

सरळ मार्गाने न झालेल्या बिनविरोध निवडणुकाकडे राज्य निवडणूक आयोग डोळेझाक करत असल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला. विधानसभा अध्यक्ष  राहुल नार्वेकर यांना निवडणूक आयोगाकडून दिलेली क्लीनचीट ही संशयास्पद आहे, असा आरोपही त्यांनी केला.  धमकी, पैशांचा वापर आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर करूनच या बिनविरोध निवडणुका घडवून आणण्यात आल्या. पालिकेने ज्या अधिकाऱ्यावर ठपका ठेवला होता, त्यालाही आयोगाने क्लीनचीट दिली, हे संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचे उदाहरण आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.  “अनेक ठिकाणी उमेदवारांना पैसे देऊन नामनिर्देशन मागे घ्यायला भाग पाडण्यात आले. काही ठिकाणी तर इच्छुक उमेदवारांना थेट अर्जच भरू दिले नाहीत. आपचे उमेदवार, जनता दलाचे उमेदवार अशा अनेक पक्षांच्या उमेदवारांना नामनिर्देशन प्रक्रियेतून दूर ठेवण्यात आले,” असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. (Sanjay Raut, State Election Commission, Rahul Narvekar)

“बबन महाडिक हे नामनिर्देशन दाखल करण्यासाठी रांगेत उभे असतानाही त्यांच्या अर्जाचा स्वीकार करण्यात आला नाही. ही सरळसरळ दहशत असून, यामागे विधानसभा अध्यक्षांची भूमिका आहे,” असा पुनरुच्चार  खासदार राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. निवडणूक आयोगाच्या डोळ्याच्या खाचा झाल्या आहेत का? की त्यांच्या डोळ्यांत गारगोट्या आहेत? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. “या परिस्थितीत निवडणूक आयोगाला काहीच दिसत नसेल, तर आयोग सत्ताधारी पक्षासाठी काम करत असल्याचा निष्कर्ष अपरिहार्य ठरतो. या निवडणूक आयोगाच्या काळात ७० ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत. याआधीच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडणुका कधीच झाल्या नव्हत्या,” असा दावा त्यांनी यावेळी केला आहे. (Sanjay Raut, State Election Commission, Rahul Narvekar)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00