Home » Blog » Bjp Minister’s remark:  शॉर्ट घालणाऱ्या महिला आवडत नाहीत : भाजपच्या मंत्र्याचे विधान

Bjp Minister’s remark:  शॉर्ट घालणाऱ्या महिला आवडत नाहीत : भाजपच्या मंत्र्याचे विधान

by प्रतिनिधी
0 comments
Bjp Minister’s remark

नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनी गुरुवारी (५ जून) महिलांविषयी आणखी एक वादग्रस्त टिप्पणी केली. ‘‘मला शॉर्ट घालणाऱ्या महिला आवडत नाहीत. आणि अशा महिलांसोबत सेल्फी घेण्यास मी नकार देतो, असे ते म्हणाले. (Bjp Minister’s remark)

 ‘‘माझा असा विश्वास आहे की महिलांनी भारतीय पोशाखासारखे सुंदर कपडे घालावेत, कारण आपल्या संस्कृतीत ते खूप मानले जाते, पण, इतर काही देशांमध्ये कमी कपडे घालणाऱ्या महिलांना अनेकदा फॅशनेबल म्हटले जाते. तसेच कमी भाषणे देणारे राजकारणी चांगले असतात, अशी काही देशांमध्ये एक म्हण आहे, मी यावर विश्वास ठेवत नाही. मी महिलांना देवी मानतो आणि त्यांनी चांगले कपडे घालावेत. मला अशा महिला किंवा मुली आवडत नाहीत ज्या शॉर्ट घालतात, त्यामुळे मी त्यांच्यासोबत फोटो काढण्यास नकार देतो.’’ (Bjp Minister’s remark)

ही पहिलीच वेळ नाही

महिलांच्या पोशाखांबाबत भाष्य करण्याची विजयवर्गीय यांची ही पहिलीच वेळ नाही. २०२४ मध्ये विजयवर्गीय यांनी ‘वाईट पोशाख’ घातलेल्या महिलांची तुलना रामायणातील शूर्पणखेशी केली होती. त्यांच्या या विधानावर प्रचंड टीका झाली होती. इंदूरमधील एका धार्मिक मेळाव्यात केलेल्या त्या आधीच्या विधानामुळे राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

‘‘आपण महिलांमध्ये देवीचे रूप पाहतो. परंतु (मुली) ज्या प्रकारचे वाईट पोशाख घालून फिरतात ते पाहता त्या देवींना मूर्त रूप देत नाहीत तर शूर्पणखासारख्या दिसतात,’’ असे ते म्हणाले होते. (Bjp Minister’s remark)

“देवाने तुम्हाला एक चांगले आणि सुंदर शरीर दिले आहे…, चांगले कपडे घाला,” असा सल्ला त्यांनी दिला.

त्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विजयवर्गीय यांच्यावर कडाडून टीका केली होती. “आपण तालिबानी राजवटीत राहतो का? महिलांनी काय घालावे, काय खावे आणि कोणाला भेटावे हेही सरकार सांगेल?” असा प्रश्न अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या प्रमुख नेट्टा डिसोझा यांनी विचारला. महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या मौनावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी भाजपच्या महिलांबद्दल अनादरपूर्ण वृत्तीवर जोरदार टीका केली होती. “कैलाश विजयवर्गीय जे बोलत आहेत त्यावरून भाजपमधील ‘शूर्पणखा’बद्दलचे प्रेम दिसून येते. “हे भाजपचे चारित्र्य आहे,” असे त्या म्हणाल्या. तृणमूल काँग्रेसनेही या वक्तव्याचा निषेध केला होता.

हेही वाचा :
चेंगराचेंगरीप्रकरणी ‘आरसीबी’वर गुन्हा
समृद्धी  महामार्ग प्रकल्पात १५ हजार कोटींचा भ्रष्टाचार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00