जमीर काझी : मुंबई : ‘केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. जयपूरमध्ये सोमवारी माझ्यावर हल्ला करणारे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत, असा गंभीर आरोप कॉकरोच जनता पार्टीचे (सीजीपी) संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला . आज जर शहीद भगतसिंग, राजगुरू यांनी आंदोलन केलं असते तर त्यांनाही देशद्रोही ठरवले असते, असा टोला केंद्र सरकारवर लगावला.
कॉक्रोच पार्टीकडून मंगळवारी नागपुरात आंदोलन करण्यात आले.त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्यावरील हल्यामागे सत्ताधारी भाजपा व आरएसएस असल्याचा आरोप केला. ते म्हणाले,”सहा जूनला दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलनावेळी आम्ही जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा अल्टिमेटम दिला आहे. येत्या २० जूनला दिल्लीत आंदोलन होणार आहे. आम्ही शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय परतणार नाही,” (Abhijit Deepke’s allegation regarding the RSS)
पेपर लिक न झालेल्या चार परीक्षा दाखवा
अभिजीत दिपके म्हणाले,” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती असेल की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. नरेंद्र मोदींना सत्तेत येऊन चार हजार दिवस झालेत. या काळात त्यांनी कोणत्याही चार परीक्षा दाखवा ज्या लिक झालेल्या नाहीत. पेपर लिक झाल्यानंतर परीक्षा रद्द झाल्या. त्यामुळं पाच विद्यार्थी आत्महत्या करतात. कारवाईच्या नावावर अधिकाऱ्याची फक्त बदली केली जाते. विद्यार्थ्याच्या जीवाची इतकीच किंमत का?” असा प्रश्न दिपके यांनी विचारला. (Abhijit Deepke’s allegation regarding the RSS)
माझ्यावर झालेला बेरोजगारीमुळे
“जयपूर इथे आंदोलन करत असताना माझ्यावर झालेला हल्ला हा बेरोजगारीमुळे झाला. हल्लेखोराकडे चांगली नोकरी असती तर तो हल्ला झाला नसता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी माझ्यावरती हल्ला केला. आज सत्तेत जे असतील त्यांना प्रश्न तर विचारणारच आहोत. आपल्या देशात हिंदू-मुस्लिम या मुद्यावर राजकारण होत आहे. यातून युवकांना काय मिळणार? काहीच नाही. आमचं शांततापूर्ण आंदोलन असणार आहे. आम्हाला बांगलादेश, नेपाळकडं पाहण्याची गरज नाही. महात्मा गांधींनी देशात बदल घडवला होता. देशात लोकशाही टिकवण्यासाठी आंदोलन महत्वाचं आहे. माझ्या कुटुंबाप्रती असणाऱ्या जबाबदारीपेक्षा माझी देशाप्रती मोठी जबाबदारी आहे,” (Abhijit Deepke’s allegation regarding the RSS)
“ज्यांना देशातील युवकांची चिंता आहे, त्यांनी या आंदोलनात येऊन सहकार्य करावं. जे माझे मित्र आहेत ते मला सहकार्य करत आहे. मी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो. माझ्यावर जर कोणी हात उगारला तर मी हात उचलणर नाही, असे हल्ले आंदोलन मुद्द्यावरून भडकवण्यासाठी केलं जातात असेही ते म्हणाले. (Abhijit Deepke’s allegation regarding the RSS)