पुणे कसोटीत सॅटनरची ‘शानदार’ कामिगरी

Mitchell Santner

पुणे : भारत-न्यूझीलंड यांच्यातील पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फिरकीपटूंनी सामन्यावर वर्चस्व राखले होते. यात वॉशिंग्टनने सात, तर आर. अश्विनने तीन फलंदाजांना बाद करत न्यूझीलंडला २५९ धावांवर गुंडाळले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरेलेले भारतीय फलंदाज न्यूझीलंडच्या फिरकीचे शिकार झाले. यात न्यूझीलंडच्या मिचेल सॅटनरने सामन्यात सात फलंदाजांना बाद करत विशेष कामगिरी केली आहे. (Mitchell Santner)

पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताच्या वॉशिंग्टनने सुंदरने केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती न्यूझीलंडच्या मिचेल सॅटनरने दुसऱ्या दिवशी केली आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताच्या सुंदरने सात विकेट घेत न्यूझीलंडचे कंबरडे मोडले. तर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सँटनरनेही सात विकेट घेत टीम इंडियाची अवस्था खराब केली.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सँटनरने १९.३ षटकांत ५३ धावांत सात बळी घेतले. त्याची कसोटी कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. सॅटनरसाठी ही विशेष कामगिरी आहे. कारण, न्यूझीलंडच्या खेळाडूंनी भारतात एका डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेण्याच्या यादीत त्याने आपले स्थान निर्माण केले आहे. (Mitchell Santner)

या यादीत सॅन्टनरशिवाय त्याचासह एजाज पटेल, जॉन ब्रेसवेल, डॅनियल व्हिटोरी आणि हॅडली हॉवर्थ यांचा समावेश आहे. भारतातील सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम एजाज पटेलच्या नावावर आहे. त्याने २०२१ साली मुंबईत भारताविरुद्ध एका डावात सर्व 10 विकेट घेतल्या होत्या.

या फलंदाजांना सॅटनरने केले बाद

सँटनरने शुभमन गिलच्या विकेटने दिवसाची सुरुवात केली. यानंतर त्याने विराट कोहलीला आपला शिकार बनवले. बेंगळुरूमध्ये शतक झळकावणारा सरफराज खानही सॅन्टनरचा बळी ठरला. त्यानंतर त्याने रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह यांच्या विकेट घेतल्या.
भारतात एका डावात ५ बळी घेणारे न्यूझीलंडचा फिरकीपटू

खेळाडू –         विकेट   –   ठिकाण

  • एजाज पटेल        १०             वानखेडे (२०२१)
  • मिचेल सँटनर       ७             पुणे (२०२४)
  • जॉन ब्रेसवेल         ६             वानखेडे (१९८८)
  • डॅनियल व्हिटोरी   ६             कानपूर (१९९९)
  • हॅडली हॉवर्थ        ५              नागपूर (१९६९)
  • डॅनियल व्हिटोरी   ५             हैदराबाद (२०१०)

हेही वाचा : 

Related posts

Hajare Trophy

Hazare Trophy : महाराष्ट्र उपांत्य फेरीत

Malaysia Open

Malaysia Open : सात्विक-चिराग उपांत्य फेरीत पराभूत

Srilanka

Srilanka : श्रीलंकेने केला शेवट गोड