Mislead by G Map: गुगल मॅपमुळे पोलीस झाले ‘दरोडेखोर’

Mislead by G Map

दिसपूर (आसाम) : आसाम पोलिसांनी छापा मारण्यासाठी गुगल मॅपचा वापर केला. गुगल मॅपने चुकीचा मार्ग दाखवला. पोलीस नागालँडला पोहोचले, पण तेथील गावकऱ्यांनी दरोडखोर समजून रात्रभर पोलिसांना डांबून ठेवले. त्यामुळे पोलिसांना मोठ्या मन:स्तापाला सामोरे जावे लागले. ‘पीटीआय’ने हे वृत्त दिले आहे. (Mislead by G Map)

आसाम पोलिसांना एका गुन्हेगाराची टीप मिळाली. त्यानंतर गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलीस आणि अधिकाऱ्यांचे १६ जणांचे पथक छापा टाकण्यासाठी रवाना झाला. छापा टाकण्याचे ठिकाण शोधण्यासाठी त्यांनी गुगल मॅपचा आधार घेतला. गुगल मॅपचा आधार घेत आसाम पोलीस नागालँडमध्ये मोकोकचुंग गावात पोहोचले. मंगळवारी रात्रीची घटना. १६ पोलिसांपैकी अनेकजण साध्या पोशाखात होते. साध्या पोशाखात असलेल्या पोलिसांवर स्थानिक नागरिकांनी दरोडखोर समजून हल्ला चढवला. त्यांना पकडले आणि रात्रभर डांबून ठेवले.(Mislead by G Map)

दरम्यान मोकोकचुंग गावातील नागरिकांनी नागालँड पोलिसांना या घटनेची माहिती दिली. नागालँड पोलीस गावात पोचले. त्यांनी डांबून ठेवलेल्या १६ जणांकडे चौकशी केली असता ते आसाम पोलीस असल्याचे लक्षात आल्यावर नागालँड पोलिसांनी कपाळावर हात मारुन घेतला. त्यानंतर सर्व पोलिसांची सुटका केली.

हेही वाचा :

 पाच मिनिटे श्वासही घेता येत नव्हता!

 

Related posts

Patient Suicide : लाभ नाकारला; कॅन्सर रुग्णाची आत्महत्या

Los angeles wildfires : अग्नितांडव; तीन लाखांवर लोक ‘बेघर’

Tirupati Stampede : पाच मिनिटे श्वासही घेता येत नव्हता!