नवी दिल्ली : प्रतिनिधी : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अमित शहांची तुलना १८ व्या शतकातील लष्करी सेनापती मीर जाफरशी केली आहे. ज्याने प्लासीच्या युद्धात नवाब सिराज उद्दोलाचा विश्वासघात केला होता. (Mir Jafar)
मीर जाफरने प्लासीच्या लढाईत विश्वासघात केला होता
अमित शहा पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत असा आरोप मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी करत पंतप्रधान मोदींना इशारा दिला आहे. अमित शहा हे ‘कार्यवाहक पंतप्रधान’ असल्याचे वागत आहेत असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी शहा यांच्यावर कायम विश्वास ठेऊ नये असा सल्लाही दिला. अमित शाह यांची तुलना मीर जाफरशी केली. १८ व्या शतकात प्लासीच्या युद्धात मीर जाफरने नवाब सिराज उद्दोलाचा विश्वासघात केला. ममता बॅनर्जी म्हणाल्या. अमित शहा एके दिवशी मीर जफर बनू शकतात. मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणाच्या नावाखाली निवडणूक आयोग जे काही करत आहे ते अमित शहा यांच्या इशारावर करत आहे. (Mir Jafar)
पंतप्रधानांनी अमित शहांवर विश्वास ठेऊ नये
ममता म्हणाल्या, “आम्ही पंतप्रधानांना विनंती करु शकतो की त्यांनी नेहमीच अमित शहांवर विश्वास ठेऊ नये. एक दिवस, तो तुमचा सर्वात मोठा मीर जफर होईल. वेळ असताना सावध रहा. कारण सकाळ दिवस दाखवते”. ममता यांची ही टीका निवडणूक आयोगाच्या वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आली आहे. निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करत आहे. बिहारमधील मतदार यादीच्या पुनर्रचना कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप विरोध पक्षांनी अनेक प्रसंगी केला आहे. (Mir Jafar)
ममतांचे निवडणूक आयोगाला सवाल
निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीबाबत ममता बॅनर्जी म्हणाल्या, त्यांचा एक नेता येतो आणि इथे येऊन सांगतो की तो बंगालच्या मतदार यादीतून लाखो नावे वगळेल. सध्या बंगाल नैसर्गिक आपत्ती, मुसळधार पाऊस, सण साजरे करणे या समस्यांना तोंड देत आहोत. एसआयआरची प्रक्रिया पंधरा दिवसात पूर्ण करता येईल का? सध्याच्या परिस्थितीत नवीन नावे अपलोड करता येतील का असा सवालही ममतांनी विचारला. (Mir Jafar)