Home » Blog » Soaked banknotes: सौंदत्ती डोंगरावर भिजलेल्या नोटांचे वाळवण

Soaked banknotes: सौंदत्ती डोंगरावर भिजलेल्या नोटांचे वाळवण

by प्रतिनिधी
0 comments
Soaked banknotes

बेळगाव : प्रतिनिधी : सौंदत्ती डोंगरावर दोन दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश पाऊस झाला होता. या पावसाने परिसराची प्रचंड हानी केली. रस्ते वाहून गेले, अनेक वाहनेही वाहून गेली. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले. डोंगरावरील श्री यल्लम्मा मंदिरातही पाण्याचे लोटच्या लोट घुसले. मंदिरातील हुंडींमध्ये पाणी शिरून त्यातील नोटा ओल्या झाल्या. आता पाणी ओसरल्यावर ओल्या झालेल्या नोटा मंदिर परिसरात वाळत घातल्या आहेत. (Soaked banknotes)

ढगफुटी सदृश्य पावसामुळे दोन दिवसापूर्वी सौंदत्ती येथील श्री यल्लम्मा मंदिरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले होते. देवीच्या गाभाऱ्यातही पाणी गेले होते. पाणी मंदिरात ठेवण्यात आलेल्या दान पेटीत शिरल्यामुळे त्यातील नोटा आणि नाणी भिजून गेली होती. (Soaked banknotes)

मंगळवारी या दानपेट्या उघडून त्यातील पाणी काढण्यात आले. भिजलेल्या नोटा बाहेर काढण्यात आल्या. देवस्थानाच्या  कर्मचाऱ्यांनी  नोटा आणि नाणी वेगवेगळ्या केली. नंतर या नोटा मंदिराच्या आवारात वाळत घातल्या आहेत. मंदिराचीदेखील स्वच्छता करण्यात आली आहे. नियमीत दर्शन सुरू करण्यात आले असल्याची माहिती श्री यल्लम्मा देवस्थान प्राधिकरणाचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी दिली.

शुक्रवारी सीमाभागातील या परिसराला मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला. संपूर्ण परिसर जलमय झाला. पावसाच्या प्रवाहाने यल्लमा डोंगराला जोडणारा रस्ता वाहून गेला. (Soaked banknotes)
सुमारे दोन तासांहून अधिक काळ पाऊस झाला. नाले-ओहोळ भरून वाहिले. रस्ता वाहून गेल्याने मार्गावरील वाहतूक बंद झाली. त्यामुळे भक्तांची मोठी गैरसोय झाली. मंदिराशेजारील मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने अनेक दुचाकी वाहने वाहून गेली. अनेक घरांमध्ये पाणी घुसले. शिवाय मंदिरातही पाणी घुसल्यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00