मुंबई : प्रतिनिधी : पूर्ण देश आज विकसित भारताच्या संकल्पात जोडला गेला आहे. विकसित भारत म्हणजे गती आणि प्रगती असेल. तिथे फक्त लोकांचेच हित पाहिले जाईल. जिथे सरकारची योजना देशवासियांचे आयुष्य सोपे बनवेल. त्याच धर्तीवर मुंबईला दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाला आहे. हे विमानतळ अशियाच्या सर्वात मोठ्या कनेक्टिविटी हबच्या रुपाने स्थापित करण्यास खूप मोठी भूमिका निभावणार आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. (Asians Konquivity Hub)
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन, मेट्रो आणि विविध योजनांचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतीर्दीत्य शिंदे, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मेट्रो विकसित भारताचे जिवंत प्रतिक
पंतप्रधान मोदींच्या हस्ते अंडरग्राउंड मेट्रोचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले. ते म्हणाले, आज मुंबईला अंडरग्राउंड मेट्रो मिळाली आहे. त्यामुळे मुंबईचा प्रवास सोपा होणार असून वेळेची बचत होणार आहे. ही अंडरग्राउंड मेट्रो विकसित भारताचे जिवंत प्रतिक आहे. मुंबईसारख्या व्यस्त शहरात जमिनीच्या खाली ही शानदार मेट्रो बनवली आहे. प्रकल्प उभारणीतील सहभागी सर्वांचे मोदींनी अभिनंदन केले. (Asians Konquivity Hub)
पंतप्रधानाकडून महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन
पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र सरकारने शेकडो आयटीआयमधील नवीन सुरू केलेल्या कार्यक्रमाचे अभिनंदन केले. ते म्हणाले, देशातील तरुणांना संधी देण्यासाठी देशातच्या अनेक आयटीआय इंडस्ट्रीजसोबत जोडण्यासाठी ६० हजार कोटींची पीएम सेतू योजना सुरू झाली आहे. आजपासून महाराष्ट्र सरकारने अनेक आयटीआयमध्ये नव्या योजनेचा शुभारंभ केला आहे. त्यामध्ये ड्रोन, रोबोटिक्स, इलेक्ट्रिक वाहने, सौर उर्जा, ग्रीन हायड्रोजन अशा अनेक अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्यांना लाभ होईल.
भाषणात मोदीकडून दि.बा. पाटील यांचा उल्लेख
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात लोकनेते दि.बा पाटील यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यांचे नाव विमानतळाला द्यावी अशी मागणी स्थानिक भूमीपुत्राकडून होत आहे. पंतप्रधान म्हणाले, महाराष्ट्राचे सुपुत्त दि.बा. पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देतो. त्यांनी समाज आणि शेतकऱ्यांसाठी सेवावृत्तीने काम केले. ते आमच्यासाठी एक प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांचे कार्य सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांना नेहमी प्रेरणा देते. (Asians Konquivity Hub)