पटणा : बिहार विधानसभा निवडणूकीतील प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य केले आहे. ‘मतांसाठी नाचा म्हटले, तर नरेंद्र मोदी नाचतीलही’ अशी टीका केली.
छटीचा सण पार पडल्यानंतर राजकीय पक्षांच्या जाहीर सभा सुरू झाल्या आहेत. मुजफ्फरनगरमध्ये राजद आणि काँग्रेस पक्षाच्या संयुक्त जाहीर सभेत राहूल गांधी यांनी पंतप्रधान मोदीवर टीकास्त्र सोडले. जर तुम्ही नरेंद्र मोदींना तुमच्या मताच्या बदल्यात नाचायला सांगितले तर ते व्यासपीठावर नाचतील अशी टीका केली. यावेळी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार राजदचे तेजस्वी यादवही उपस्थित होते. (Muzaffarabad)
छट पूजेनिमित्त एकीकडे भाविक दिल्लीतील प्रदुषित यमुना नदीत स्नान करत असताना पंतप्रधानांनी खास त्यांच्यासाठी बनवलेल्या विशेष तलावात डुबकी मारली. या घटनेचा संदर्भ घेत राहूल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या स्विमिंग पूलमध्ये स्नान केले. त्यांचा यमुनेशी काहीही संबध नाही. त्यांचा छट पूजेशी काहीही संबध नाही. त्यांना फक्त तुमची मते हवी आहेत, अशी टीका केली. (Muzaffarabad)
मुख्यमंत्री नीतीश कुमारांवर टीका करताना राहूल गांधी म्हणाले, नीतीशजींचा चेहरा वापरला जात आहे. पण रिमोट कंट्रोल भाजपाच्या हातात आहे. तुम्ही असा विचार करु नका की ते सर्वात मागासलेल्या लोकांचा आवाज ऐकतात. भाजपच्या हातात रिमोट कंट्रोल आहे. आणि त्यांचा सामाजिक न्यायाशी काहीही संबध नाही. महाराष्ट्र आणि हरियाणाप्रमाणे बिहारमध्येही मतचोरीचा प्रयत्न करतील अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.
युवकांना आवाहन करताना राहूल गांधींनी जाहीर सभेत उपस्थित युवकांना तुमच्या मोबाईलच्या मागे काय लिहिले आहे असे विचारले. युवकांनी मेड इन चायना असे म्हणता मेड इन चायना ऐवजी मेड इना बिहार असायला हवे. बिहारमध्ये मोबाईल, शर्ट, पॅन्टचे उत्पादन झाले तर तरुणांना नोकऱ्या मिळतील असेही ते म्हणाले. (Muzaffarabad)