कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा (दमसा) आणि विविध संस्थांच्या वतीने जिल्ह्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत यानिमित्त विविध उपक्रम होणार आहेत, अशी माहिती ‘दमसा’चे अध्यक्ष भीमराव धुळुबुळू, कार्यवाह डॉ.विनोद कांबळे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.(Literary Fest)
कोल्हापूर शहरातील महावीर कॉलेज येथे भीमराव धुळुबुळू यांचे २१ जानेवारीला ‘कविता सुचते कशी?’ या विषयावर सकाळी अकरा वाजता व्याख्यान होणार आहे. २२ जानेवारी रोजी सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चिखली गावातील देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक आर्ट्स ॲण्ड सायन्स कॉलेज येथे कवी संमेलन आयोजित केले आहे. अध्यक्षस्थान लता ऐवळे भूषविणार आहेत. कवी संमेलनात महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता हे संमेलन होणार आहे.(Literary Fest)
शुक्रवारी, २४ जानेवारी रोजी प्रा. डॉ. रफीक सूरज यांचे यांचे दत्ताजीराव कदम आर्टस्,कॉमर्स अँड सायन्स कॉलेज,इचलकरंजी येथे सकाळी दहा वाजता व्याख्यान होणार आहे. ‘मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी,’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. २७ जानेवारी रोजी नाईट कॉलेज, इचलकरंजी येथे सायंकाळी सहा वाजता कवी संमेलन होणार आहे. जीवन बरगे अध्यक्षस्थानी असतील. दिनकर खाडे, शैलेश खुडे, मनोज सुतार, शरद वासकर, संभाजी माने यांचा कवीसंमेलनात सहभाग असणार आहे. (Literary Fest)
हेही वाचा
‘तुकोबांची अभंगवाणी’चे प्रकाशन