KLE Belgaum: कॅन्सर रुग्णांना धीर देण्याची गरज

KLE Belgaum

बेळगाव : कॅन्सर झाल्याचे समजताच रुग्ण आणि कुटुंब घाबरून जाते. अशा परिस्थिती डॉक्टरांनी त्यांना उपचार आणि धीर देणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी काढले. (KLE Belgaum)

केएलई संस्थेच्या डॉ. संपतकुमार शिवणगी कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

बेळगावातील जिल्हा क्रीडांगणावर झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षण मंत्री शरण प्रकाश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी तीनशे कोटी रुपये खर्च आला आहे. अत्याधुनिक उपकरणांनी हॉस्पिटल सुसज्ज करण्यात आले आहे. तीनशे खाटांचे हे हॉस्पिटल कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि गोवा राज्यातील कॅन्सर रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे.(KLE Belgaum)

संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचा शाल आणि वीर राणी कित्तूर चन्नमाची मूर्ती देऊन सत्कार केला.

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, ‘कॅन्सर रुग्णाची काळजी घेणे हे उदात्त कार्य आहे. डॉक्टरांनी सहृदयतेने रुग्णावर उपचार करावेत. येथे येणाऱ्या रुग्णांना उत्तम उपचार मिळतील, याची खात्री आहे. जगात कॅन्सरने मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कॅन्सर रुग्णांची संख्या पुढील काही वर्षात तीस टक्क्यांनी वाढणार आहे.’

सरकारच्या आयुष्यमान आणि अन्य योजनांमुळे जनतेला उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. कॅन्सरबाबत जनतेत जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. म्हणजे रोगाचे निदान आणि उपचारही चांगले होतील. कुटुंबातील महिलेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. यामध्ये बदल घडला पाहिजे, अशी अपेक्षा राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

खून केला नि मृतदेहाचे तुकडे बॅरेलमध्ये भरले

Related posts

KMC Water: कोल्हापुरात सोमवारी, मंगळवारी पाणीपुरवठा बंद

Tiger rescue: वाघ पोहोचला स्वयंपाकघरात

mother’s remarriage: पाकिस्तानी युवकाने लावून दिले आईचे दुसरे लग्न