Karina Kapoor :…विपरित घडले असते  

Karina Kapoor

Karina Kapoor

मुंबई : प्रतिनिधी : सैफने हल्लेखोराचा एकट्याने सामना केला. तो मध्ये पडला नसता, त्याने प्रतिकार केला नसता तर विपरित घडले असते. माझ्या मुलांचा जीव धोक्यात होता, असे अभिनेता सैफ अली खानची पत्नी करिना कपूर हिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.(Karina Kapoor)

सैफवरील हल्ल्याच्या घटनेनंतर सर्व संबंधितांचे जबाब घेत चौकशी केली जात आहे. आत्तापर्यंत ५५ ते ६० व्यक्तींची चौकशी केली आहे. सैफच्या शेजारच्याकडेही चौकशी करण्यात आली आहे. करिना कपूरचा जबाबही नोंदविला आहे. त्यामध्ये ती सर्व घटनाक्रम सांगितला. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू आहे. दरम्यान, हल्लेखोराच्या शोधासाठी ३५ पथके बनवली असून गुजरात व मध्य प्रदेशमध्येही पथक पाठवण्यात आले आहे. (Karina Kapoor)

करिनाने जबाबात म्हटले आहे की, सैफने हल्लेखोराचा एकट्याने सामना केला. सैफने मुलांना आणि घरातील महिलांना १२ व्या मजल्यावर पाठवले. त्याने घरातील महिला आणि मुलांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्याने हस्तक्षेप केला नसता तर काहीही घडू शकले असते. हल्लेखोराने घरातून काहीही चोरले नाही, परंतु तो खूप आक्रमक होता. त्याने सैफवर अनेकदा हल्ला केला. त्याने मी हादरून गेले. त्यामुळे करिश्मा मला तिच्या घरी घेऊन गेली.

हेही वाचा :
सैफवरील हल्लेखोर छत्तीसगडमध्ये ताब्यात

Related posts

Sharad Pawar

Sharad Pawar : आम्ही सरकारच्या पाठीशी, पण निर्णय तडीस न्या

CM appeals BEST

CM appeals BEST: उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून ‘बेस्ट’ व्हा

Kamra case hearing

Kamra case hearing: कुणाल कामरांचा जबाब चेन्नईत जाऊन नोंदवा