ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश 

मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  शरदचंद्र पवार पक्षात जोरात ‘इन्कमिंग’सुरू आहे.  मराठवाड्यातील मराठा संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रविवारी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांना बीड मधून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Maharashtra Assembly Election )
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील,  राष्ट्रीय कार्याध्यक्ष, खा.  सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत  मुंबई येथे  प्रवेश सोहळा
झाला. त्यांच्यासह सलीम पटेल व बाळासाहेब खोसे यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री  विजयसिंह मोहिते- पाटील, सोलापूरचे खासदार  धैर्यशील मोहिते- पाटील व आमदार  शशिकांत शिंदे आदी  उपस्थित होते.

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ