कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि व्यासंगी इतिहास संशोधक, अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर झाला आहे. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी २६ जून रोजी मान्यवरांच्या हस्ते पुस्कार देण्यात येणार आहे. रोख एक लाख रुपये, स्मृतीचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली. यावेळी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भारुड, निवासी उप जिल्हाधिकारी गजानन गुरव, ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अशोक चौसाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. (Jaisingrao Pawar announced as the posthumous recipient of the Shahu Award)
डॉ. जयसिंगराव पवार यांनी मराठेशाहीचा इतिहास आणि राजर्षी शाहू महाराजांचे विचार जगभरात पोहोचवण्याचे आयुष्यभर कार्य केले. सांगली जिल्ह्यातील तडसर गावच्या डॉ. पवारांचे उच्च शिक्षण राजाराम महाविद्यालयात तर शिवाजी विद्यापीठात एम.ए.ही पदवी घेऊन या विषयाची पी.एचडी मिळवली. (Jaisingrao Pawar announced as the posthumous recipient of the Shahu Award)
डॉ. पवार यांनी ४० हून अधिक जास्त इतिहास विषयांचे ग्रथांचे लेखन केले. त्यांनी १२५० पानांचा राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ संपादित केला. हा ग्रंथ इतिहासातील मैलाचा दगड मानला जातो. त्यांच्या पुढाकाराने व महाराष्ट्र इतिहास प्रबोधनीच्या माध्यमातून राजर्षी शाहूंचे चरित्र मराठीसह अनेक भारतीय आणि परकीय भाषांमध्ये भाषांतरीत करण्यात आले. शिवपुत्र छत्रपती राजाम महाराज, सेनापती संताजी घोरपडे, या त्यांच्या ग्रंथांना सर्वोत्कृष्ट इतिहास ग्रंथ राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराणी ताराराणी, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसिंह नाना पाटील, सेनापती संताजी घोरपडे, राजर्षी शाहू एक दृष्टीक्षेप, छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ, मराठीशाहीचा मागोवा, श्री शहाजी छत्रपती स्मृतीग्रंथ, राजर्षी शाहू पंचखंडात्मक ग्रंथ असे ४० ग्रंथ लिहिले आहेत. त्यांना देशभरातील नामवंत संस्थांनी विविध पुरस्कार देऊन गौरव केला आहे. (Jaisingrao Pawar announced as the posthumous recipient of the Shahu Award)