Home » Blog » फिफा विश्वचषक स्पर्धेत भारतीय मल्याळी खेळाडू खेळणार

फिफा विश्वचषक स्पर्धेत भारतीय मल्याळी खेळाडू खेळणार

by प्रतिनिधी
0 comments
(Indian players to play in FIFA World Cup)

कोची : भारतीय संघ फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत नसला तरी भारतीय खेळाडू मात्र फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहे. केरळचा १९ वर्षीय मल्याळी खेळाडू तहसीन जमशीद हा कतार संघाकडून खेळणार आहे. अमेरिका, कॅनडा, मेक्सिको येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी तहसीन सज्ज झाला आहे. कतारने २६ जणांच्या संघात तहसीनचा समावेश झाल्याने हा एकोणीस वर्षीय खेळाडू विश्वचषक स्पर्धेत खेळणारा पहिला भारतीय पासपोर्टधारक ठरणार आहे.

तहसीनचे पालक हे मुळचे केरळचे असून तहसीनचा जन्म कतारची राजधानी दोहा येथे झाला आहे. त्याच्याकडे भारतीय पासपोर्टबरोबर कतारी मिशन पासपोर्ट आहे. हा पासपोर्ट परदेशी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये कतारचे प्रतिनिधीत्व करण्याची परवानगी देतो. त्यामुळे तहसिनची कतारच्या संघात निवड झाली आहे.(Indian players to play in FIFA World Cup)

तहसीनचे वडील जमशीद हे केरळमधील थलासेरीचे आहेत. त्याची पत्नी शायना कन्नूर जिल्ह्यातील वलपट्टणमची आहे. नोकरीच्या शोधातील हे कुटुंब कतारमध्ये स्थायिक झाले आहे. केरळमधील फुटबॉलचे प्रेमी जमशीद कतारलाही घेऊन गेले. (Indian players to play in FIFA World Cup)

तहसीनचा कतारच्या एस्पायर फुटबॉल अकादमीमध्ये खेळ बहरला. २०२१ मध्ये कतारच्या १६ वयोगट राष्ट्रीय संघात त्याला स्थान मिळाले. तहसिन दोन्ही विंग्जवर खेळू शकतो. त्याला स्टायकर म्हणून वापरता येते. त्याच्याकडे विलक्षण ड्रिब्लिंगचे कौशल्य आहे. बॉक्सच्या आत तो आक्रमक असतो असे त्याच्या वडिलांनी अभिमानाने सांगितले. कतार स्टार्स लिगचा बलाढ्य संघ असलेल्या अल दुहैलमध्ये त्यांच्या खेळाने प्रगती कायम ठेवली. २०२३ मध्ये एक्सपोजर टूरदरम्यान भारताच्या युवा संघविरोधात कतारच्या १७ वयोगट संघात त्याचा समावेश होता. चीनमध्ये झालेल्या एएफसी यू २० अशिया कपमध्ये प्रभावी कामगिरी केली. २०२४ मध्ये अफगाणिस्तान विरुद्धच्या विश्वकप पात्रता सामन्यात कतारकडून त्याने पदार्पण केले.

तहसीलनचे वडील जमशीद हे उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू असून १९८५ मध्ये केरळच्या सब ज्युनिअर संघात प्रतिनिधीत्व केले. पण वयाच्या २५ वर्षी दुखापतीमुळे फुटबॉलमधून त्यांना निवृत्त व्हावे लागले. या धक्क्याने त्यांची फुटबॉलवरुल निष्ठा कमी झाली नाही. कतारमध्ये एका खासगी कंपनीत काम करत असताना ते या खेळाशी कायम जोडले गेले. जमशीद यांची दोन्ही मुले तहसीन आणि मोठा भाऊ मिशेल यांना फुटबॉलमध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्यासोबत ते मैदानावर जात आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणांवर लक्ष ठेवायचे. (Indian players to play in FIFA World Cup)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00