lead in turmeric : तुम्ही वापरताय ती हळद रंग तर नाही ना?

नवी दिल्ली : रोहिणी कृष्णमूर्ती : आपण रोज वापरत असलेल्या हळदीत शिशाचे प्रमाण घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. हे प्रमाण घातक परिणाम करणारे आहे. भारत, नेपाळ आणि पाकिस्तानात विकल्या जाणाऱ्या हळदीचे काही नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले. त्यात शिशाचे प्रमाण नियामक मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले आहे. (lead in turmeric  )

हळदीच्या नमुन्यांमध्ये रंग, रबर, प्लास्टिक आणि सिरॅमिक कोटिंग्समध्ये वापरला जाणारा पिवळा रंगद्रव्यही वापरला असल्याचे या अभ्यासात आढळले आहे.

‘सायन्स ऑफ द टोटल एन्व्हायर्नमेंट’मध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानुसार, भारतातील पाटणा आणि पाकिस्तानातील कराची आणि पेशावरमध्ये विकल्या जाणाऱ्या नमुन्यांमध्ये हळदीतील शिशाचे प्रमाण १,००० मायक्रोग्रॅम प्रतिलिटर किंवा त्यापेक्षा जास्त आढळले. गुवाहाटी आणि चेन्नईतही भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा शिशाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. (lead in turmeric  )

अन्न सुरक्षा आणि मानके नियमानुसार, हळकुंड किंवा आणि हळद पावडरमध्ये शिशाचे प्रमाण १० मायक्रोग्रॅम इतकेच असायला हवे. मात्र ते जास्त आढळल्यामुळे चिंतेचे कारण ठरत आहे.

भारत आणि पाकिस्तानात घेतलेल्या हळदीच्या नमुन्यांपैकी १४ टक्के नमुन्यांमध्ये शिशाचे प्रमाण प्रति ग्रॅम २ मायक्रोग्रॅमपेक्षा जास्त आढळले. तर जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार, शिशाचे सेवन सुरक्षित नाही. भारतात, पाटणा आणि गुवाहाटीमध्ये कमाल पातळी प्रतिग्रॅम  १२६ मायक्रोग्रॅम ते २,२७४ मायक्रोग्रॅम आणि आढळली. दोन्ही ठिकाणचे नमुने बिहारमधून मागवण्यात आले होते, असे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. त्यातही पॉलिश केलेल्या हळकुंडात हे प्रमाण सर्वांत जास्त आढळले. त्यानंतर पावडर, पॅकेज केलेल्या ब्रँडेड पावडर आणि पॉलिश न केलेल्या हळकुंडातही हे प्रमाण जास्त होते. पॅक केलेल्या हळदीपेक्षा सुट्या आणि नियमन नसलेल्या मसाल्यांमध्ये भेसळ होण्याची शक्यता जास्त असते, असे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. (lead in turmeric  )

त्यामुळे अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी करतात काय, असा सवाल उपस्थित होत आहे. लोकांच्या जीवनमरणाशी असलेल्या या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांना अजिबातच गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे.

हृदयरोग, मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका

शिशाचे प्रमाण जास्त असलेल्या हळदीच्या नियमीत वापरामुळे मानवी आरोग्य धोक्यात येते. विशेषत: लहान मुलांना त्यामुळे विषबाधा होते. प्रमाणापेक्षा जास्त झालेले शिसे हाडांमध्ये साचते. त्यामुळे चयापचय प्रक्रियेत व्यत्यय निर्माण होतो. शिवाय बुद्धिमत्तेवर परिणाम करते. हृदयरोग, मूत्रपिंड निकामी होणे किंवा अकाली मृत्यूचा धोकाही त्यामुळे वाढतो. मुलांच्या रक्तातील शिशाची पातळी जास्त असेल तर त्यांचा बुद्ध्यांक कमी हातो.

मुलांच्या मेंदूची वाढ खुंटते

जागतिक स्तरावर, ८१५ दशलक्ष मुलांमध्ये रक्तातील शिशाची पातळी ५० ग्रॅम प्रतिलिटर तर ४१३ दशलक्ष मुलांमध्ये ही पातळी १०० ग्रॅमपेक्षाही जास्त असल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुलांच्या मेंदूंची वाढ, त्यांच्या वर्तनातील अडचणी आणि एकूणच त्यांच्या सर्वांगीण वाढीवर विपरीत परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हळदीबरोबरच अन्य खाद्यपदार्थांबाबतही सजग राहण्याची नितांत आवश्यकता आहे.

हेही वाचा :

आंबेडकरी आणि मराठा समाजावर मार खाण्याची वेळ का आलीय?

मी कुणाच्या हातचे बाहुले नाही…

https://www.downtoearth.org.in/health/lead-in-turmeric-more-than-200-times-the-limit-in-parts-of-india-study

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

हत्तींच्या संवेदनशीलतेचे, परोपकाराचे दर्शन…

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित