Home » Blog » Chinnaswamy : एकाच मैदानावर कोहलीची सर्वाधिक अर्धशतके

Chinnaswamy : एकाच मैदानावर कोहलीची सर्वाधिक अर्धशतके

चिन्नास्वामी मैदानावर २६ अर्धशतके

by प्रतिनिधी
0 comments
Chinnaswamy

बेंगळुरू : प्रतिनिधी : रायस्थान रॉयल्सविरुध्द विराट कोहलीने अर्धशतक झळकावत ४२ चेंडूत ७० धावा फटकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. कोहलीच्या अर्धशतकामुळे एका नवीन विक्रमाची नोंद झाली आहे. बेंगळूरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कोहलीने सर्वाधीक २६ अर्धशतके झळकावत नवीन विक्रम स्थापित केला आहे. (Chinnaswamy)

या हंगामात रॉयल चॅलेंज बेंगळुरुला घरच्या मैदानावर विजय मिळवत आला नव्हता. पण गुरुवारी झालेल्या सामान्यात बेंगळुरुने राजस्थान रॉयल्सवर विजय संपादन केला. या सामन्यात विराटने अप्रतिम खेळी करत ४२ चेंडूत ७० धावा केल्या. एकाच मैदानावर सर्वाधिक २६ अर्धशतके नावावर करण्याचा विक्रम कोहलीने केला आहे.  विराटने चिन्नास्वामी स्टेडियमवर सर्वाधिक अर्धशतके झळकाली. त्याने इंग्लंडच्या अलेक्स हेल्सला मागे टाकले आहे. त्याने यापूर्वी नॅटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज येथे २५ अर्धशतके केली आहेत. अलेक्स हेक्सचा विक्रम विराटने मोडीत काढला आहे. विक्रमानंतर विराट म्हणाला. “आयपीएलमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियम हे सर्वोत्तम मैदान आहे.  इथल्या चाहत्यांनी चांगल्या आणि वाईट काळात आम्हाला साथ दिली. हे एक खास ठिकाण आहे आणि त्याच्या अनेक खास आठवणी आहेत.” (Chinnaswamy)

 टी टेव्टींमध्ये एका ठिकाणी अर्धशतके झळकावले खेळाडू असे

विराट कोहली, एम चिन्नास्वामी स्टेडियम बेंगळुरु २६ अर्धशतके

अलेक्स हेल्स, ट्रेंट ब्रिज, नॅटिंगहॅम, २५ अर्धशतके

जेम्स विन्स, द रोझ बाउल, साउथहॅम्पटन, २४ अर्धशतके

तमीम इक्बाल, शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियमम, मीरपूर ढाका, २३ अर्धशतके

जेसन रॉय, द ओव्हल, लंडन, २१ अर्धशतके. (Chinnaswamy)

हेही वाचा :

 वैभव सूर्यवंशीला सेहवागचा कडक सल्ला

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00