Home » Blog » Iran Blast : इराणमध्ये भीषण स्फोट

Iran Blast : इराणमध्ये भीषण स्फोट

चार ठार; पाचशेहून अधिक जखमी

by प्रतिनिधी
0 comments
Iran Blast

तेहरान : इराणच्या बंदर अब्बास येथील शहीद राजाई बंदरामध्ये शनिवारी झालेल्या भीषण स्फोटात ४ ठार झाले. या स्फोटातील जखमींची संख्या पाचशेहून अधिक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. (Iran Blast)

प्राथमिक माहितीनुसार, या बंदराच्या धक्क्यावर असणाऱ्या कंटेनरमधील स्फोटकांमुळे हा भीषण स्फोट झाला. सध्या या ठिकाणाहून लोकांना बाहेर काढण्याचे, तसेच जखमींना वैद्यकीय मदत पुरवण्याचे काम सुरू असल्याचे वृत्त तस्निम या इराणच्या वृत्तवाहिनीने दिले आहे. ज्वलनशील पदार्थांचा साठा करताना योग्य काळजी न घेतल्यामुळे हा स्फोट झाल्याचे इराणच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे प्रवक्ते होसेन झाफरी यांनी दिली. या स्फोटामुळे हवेत उंचवर धुराचे लोळ उठल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले. त्यावरून स्फोटाची भीषणता लक्षात येते. त्याचप्रमाणे, स्फोटाच्या तीव्रतेमुळे काही किलोमीटरपर्यंत काचेची तावदाने फुटली. तेहरानपासून अग्नेयेला १,०५० किलोमीटरवर होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ हे बंदर आहे. जगातील एकूण २० टक्के कच्च्या तेलाची वाहतूक ज्या पर्शियन आखातातून होते, त्या आखाताचा प्रवेशमार्ग म्हणून हा सामुद्रधुनी ओळखला जातो. (Iran Blast)

दरम्यान, या स्फोटाची झळ या भागात असलेल्या तेलसाठ्यापर्यंत पोहोचली नसल्याची माहिती इराणच्या राष्ट्रीय तेल उत्पादन, शुद्धिकरण आणि वितरण कंपनीने दिली.

अण्वस्त्रविषयक चर्चांवेळीच स्फोट

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये ओमान येथे अण्वस्त्रविषयक चर्चेची तिसरी फेरी सुरू असतानाच हा स्फोट झाला. अमेरिकेचे विशेष राजदूत स्टीव्ह विट्कॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यादरम्यान ही चर्चा सुरू आहे. (Iran Blast)

हेही वाचा :
गुजरातेत सापडले हजारावर बांगलादेशी
चौकीदाराने प्रामाणिक काम केले नाही

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00