Home » Blog » चार प्रमुख विमानतळांवर ४०० हून अधिक उड्डाणे रद्द

चार प्रमुख विमानतळांवर ४०० हून अधिक उड्डाणे रद्द

by प्रतिनिधी
0 comments
IndiGo cancels 400 flights

नवी दिल्ली : इंडिगोच्या विमानसेवा अजुनही सुरळीत झाली नसून देशातील प्रमुख चार शहरातील विमानतळावर ४०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट होताना दिसून येत आहे. हतबल झालेल्या प्रवाशांचे चेहरे भितीने काळवंडले असून अनेक प्रवाशांनी आपटाआपटी करुन संतापाला मोकळी वाट करुन देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण होऊ लागली आहे. विमानतळावर प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत.

नवीन ड्यूटी नियमातून तात्पुरती सवलत असून पायलट रोस्टरिंगच्या समस्यामुळे इंडिगोने चार प्रमुख विमानतळावरील ४०० उड्डाणे रद्द केली आहेत. या रद्द झालेल्या विमानांपैकी, बेंगळुरू विमानतळावरून १२४ उड्डाणे  रद्द झाली. मुंबईवरून १०९ तर दिल्ली विमानतळावरून १०६ उड्डाणे रद्द झाल्याची नोंद झाली. हैदराबादमध्ये, इंडिगोने ६६ उड्डाणे रद्द केली, असे पीटीआय सूत्रांनी सांगितले. (IndiGo cancels 400 flights)

न्यायालयाच्या आदेशानुसार वैमानिकांसाठी उड्डाण कर्तव्य आणि विश्रांती नियमांच्या दुसऱ्या टप्प्यात विमान कंपन्यांना तात्पुरती सूट मिळाल्यानंतर शनिवारी दिल्ली आणि मुंबई या दोन प्रमुख शहरांमधून २०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.

अधिकाऱ्यांच्या मते, मुंबईत इंडिगोच्या १०९ विमान रद्द करण्यात आल्या, ज्यात ५१ आगमन आणि ५८ निर्गमन यांचा समावेश आहे. दिल्ली विमानतळावर, इंडिगोच्या १०६ विमान रद्द करण्यात आल्या, ज्यामध्ये ५४ निर्गमन आणि ५२ आगमन प्रभावित झाले. (IndiGo cancels 400 flights)

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे आणि जबाबदार असलेल्यांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी दिली.  “आम्ही एक समिती स्थापन केली आहे जी या सर्वांची चौकशी करेल जेणेकरून ते कुठे चूक झाली आणि कोणी चूक केली हे शोधू शकतील. आम्ही त्यावर देखील आवश्यक कारवाई करणार आहोत. ही गोष्ट दुर्लक्षित राहू नये. आम्ही यावर कठोर कारवाई करत आहोत, जेणेकरून या घटनेला जबाबदार असलेल्यांना त्याची किंमत मोजावी लागेल.” असेही मंत्री नायडू म्हणाले. (IndiGo cancels 400 flights)

शनिवारी सकाळी, तिरुअनंतपुरम विमानतळावर सहा विमाने रद्द करण्यात आली. मुंबई विमानतळावर, इंडिगोला कामकाज सुरळीत करण्यात अडचण येत असल्याने प्रवासी अडकून पडले. चेन्नई विमानतळावरही लांब रांगा दिसून आल्या, जिथे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली.शनिवारी पुणे विमानतळावर इंडिगोच्या १४ आगमन आणि २८ निर्गमन रद्द करण्यात आल्या. (IndiGo cancels 400 flights)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00