Home » Blog » CM-Thackray meeting :‘ऑफर’नंतर दुसऱ्याच दिवशी सीएम-ठाकरे भेट

CM-Thackray meeting :‘ऑफर’नंतर दुसऱ्याच दिवशी सीएम-ठाकरे भेट

by प्रतिनिधी
0 comments
CM-Thackray meeting

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्ताधारी पक्षासोबत येण्याचे निमंत्रण दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी गुरुवारी (१७ जुलै) उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीच्या वृत्ताने अनेकांच्या भुवया उंचावल्या. फडणवीस आणि ठाकरे यांच्यातील बैठक विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांच्या कार्यालयात झाली. त्यांची बैठक सुमारे २० मिनिटे चालली. (CM-Thackray meeting)

परंतु, ही भेट कशासाठी होती, याचा खुलासा शिवसेनेच्या अधिकृत एक्स हँडलवर करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे, ‘‘आज विधानभवन येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील विविध संपादकांनी हिंदीसक्तीविरोधात लिहिलेल्या लेखांचे संकलित ‘हिंदी हवी कशाला?’ पुस्तक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सभापती राम शिंदे ह्यांना भेट दिले. ह्यावेळी युवासेना प्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते विधानसभा गटनेते भास्कर जाधव, शिवसेना नेते आमदार सुनिल प्रभू, उपनेते आमदार सचिन अहिर, आमदार अजय चौधरी, शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना प्रवक्ते हर्षल प्रधान, आमदार सुनिल राऊत, आमदार जगन्नाथ अभ्यंकर, आमदार महेश सावंत, आमदार बाळा नर, आमदार संजय देरकर उपस्थित होते. (CM-Thackray meeting)

फडणवीस यांची ऑफर काय?

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधानपरिषदेतील कार्यकाळ येत्या काही दिवसांत संपणार आहे. काल त्यांचा निरोप समारंभ होता. यनिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री, तसेच विरोधी पक्षांतील उद्धव ठाकरे आणि इतरांनी भाषणे केली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून, “अंबादास दानवे यांनी पुन्हा सभागृहात आल्यानंतर याच पदावर काम करावे, असे काही नाही. आता यावर उद्धवजी म्हणतील, आम्ही पळवापळवी करतो.” (CM-Thackray meeting) त्यावर उद्धव ठाकरे यांनीही टिप्पणी केली. यावर फडणवीस म्हणाले की, “उद्धवजी २०२९ पर्यंत तरी आम्ही त्याबाजूला (विरोधी बाकावर) येण्याचा काहीच स्कोप नाही. पण तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे. त्यावर विचार करता येईल. त्याचा विचार वेगळ्या पद्धतीने करता येईल.”

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00