Home » Blog » Friday relessed : अक्षरधाम. थ्री बीएचके, मेट्रो….इन दिनो चित्रपटांचे शुक्रवारी प्रदर्शन  

Friday relessed : अक्षरधाम. थ्री बीएचके, मेट्रो….इन दिनो चित्रपटांचे शुक्रवारी प्रदर्शन  

by प्रतिनिधी
0 comments
Friday relessed

नवी दिल्ली : जुलै महिन्यात सिनेमागृहात बारा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याची जोरदार तयारी निर्मात्यांकडून केली जात आहे. शुक्रवारी चार जुलै अक्षरधाम : ऑपरेशन वज्र शक्ती आणि थ्री बीएचके हे दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटाबद्दल सिने रसिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. (Friday relessed)

जुलै महिना आणि श्रावण महिन्याची सुरुवात हे लक्षात घेऊन ओटीटी वर ‘स्पेशल ऑप्स २.०’ वेबसिरीजसह ‘हेडस ऑफ स्टेट’ फिल्म प्रदर्शित होणार आहे. जुलैच्या चार आठवड्यात १२ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामध्ये अजय देवगणचा सन ऑफ सरदार टू, अनुराग बासुचा मेट्रो… इन दिनो हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Friday relessed)

अनुराग बसुने २००७ मध्ये लाइफ ‘इन ए… मेट्रो’ या चित्रपटाला रसिकांची चांगली पसंती मिळाली होती. चार जुलै रोजी ‘मेट्रो….इन दिनो’ हा चित्रपट रिलिज होणार आहे. या चित्रपटात अनुपम खेर, नीना गुप्ता, कोंकणा सेना शर्मा, पंकज त्रिपाटील, अदित्य रॉय कपूर, फातिमा सना शेख, अली फजल आणि सारा अली खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Friday relessed)

चार जुलैलाच ‘अक्षरधाम : ऑपरेशन वज्र शक्ती’ हा अक्षय खन्ना चा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. केन घोष दिग्दर्शित हा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अक्षय खन्ना राष्ट्रीय सुरक्षा गार्डचा ऑफिसर हनुत सिंह च्या भूमिकेत दिसणार आहे. २००२ मध्ये गुजरातमध्ये अक्षरधाम मंदिराजवळ झालेल्या अतिरेकी हल्ल्यावर आधारित हा चित्रपट आहे. (Friday relessed)

‘थ्री बीएचके’ हा चित्रपटही शुक्रवारी ४ जुलै रोजी पदर्शित होणार आहे. ही तामिळी फॅमिली ड्रामा फिल्म आहे. जी अरविंद सचिदानंदम की शॉर्ट स्टोरीवर आधारित आहे. या चित्रपटात सिद्धार्थ, आर. सरथकुमार, देवयानी, योगी बाबू, मीठा रघुनाथ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Friday relessed)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00