Home » Blog » Gaziyabad gang rape : चार शाळकरी विद्यार्थ्यांचा १४ वर्षीय मुलींवर अत्याचार

Gaziyabad gang rape : चार शाळकरी विद्यार्थ्यांचा १४ वर्षीय मुलींवर अत्याचार

by प्रतिनिधी
0 comments
Gaziyabad gang rape

गाझियाबाद : तेरा ते चौदा वयोगटातील चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी १४ वर्षीय मुलींवर अत्याचार केल्याच्या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. पोलिसांनी १४ वर्षाच्या मुलींवर तिच्या घरी बलात्कार केल्याच्या आरोपाखाली चार मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलगी नववीत शिकणारी असून संशयितांमध्ये एक वर्गमित्र आणि इतर शाळांतील तीन विद्यार्थी आहेत. मुलीच्या आईने मुलीसोबत त्यांना मुलांना पाहिले अशी माहिती मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. गाझियानगरमधील एका गृहनिर्माण सोसायटीत ही घटना घडली. (Gaziyabad gang rape)

पिडित १४ वर्षीय मुलगी आई वडिलासंमवेत एका गृहनिर्माण सोसायटीतील फ्लॅटमध्ये हात होते. ती घरी एक एकटी असताना चौघांनी तिच्यावर अत्याचार केला. संशयितांपैकी दोन मुले तिच्याच शाळेतील आहेत. एक तिच्या वर्गात शिकत असून दुसरा विद्यार्थी दहावीत शिकत आहेत. इतर दोन विद्यार्थी अकरावीचे विद्यार्थी असून ते दुसऱ्या शाळेत शिकतात.

एफआयआर मध्ये अशी माहिती की रविवारी सकाळी साडेअकरा वाजता मुलीला तिच्या मित्राचा फोन आला. ते दोघेही एकमेकांना ओळखत होते. तसेच ते सोशल मिडियावर जोडले गेलेले आहेत. तो मुलगा तिच्या शाळेत शिकत नसला तरी फोनवरुन त्याने तिला आपण तुला भेटायला येत आहे, असे सांगितले. तो मुलगा दोन दिवस तिला भेटण्यासाठी आग्रह करत होता. असा आरोप तिच्या वडीलांनी केला. (Gaziyabad gang rape)

रविवारी सकाळी मुलगी एकटीच घरी होती. वडिल कामासाठी बाहेर गेले होते तर आई बाजारात गेली होती. दरवाजाची बेल वाजल्यावर मुलीने दरवाजा उघडल्यावर तिच्या मित्रासह आणखी तीन मुले होती. चारही मुलांनी तिला जबरस्तीने एका खोलीत नेले. तिचे तोंड झाकले आणि बेडवर तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. मुलीची आई बाजारातून परत आली तेव्हा तिला फ्लॅटचा दरवाजा उघडा दिला, त्यावेळी तिने चार मुलांसोबत मुलीसोबत होते. मुलीचे आईने आतून कुलुप लावले आणि पतीला फोनवरुन घडलेली घटना सांगितली. त्यांनी तात्काळ ११२ क्रमांकावर फोन केला. जेव्हा सोसायटीतील काही रहिवासी पिडित मुलीच्या आईशी बोलत होते तेव्हा चार मुले पळून गेली. पोलिसांनी मुलांना घटनास्थळी ताब्यात घेण्यासाठी त्वरीत कारवाई केली नाही असा आरोप पिडितेच्या वडिलांनी केला आहे.

कवी नगरचे एसीपी भास्कर वर्मा यांनी माहिती दिली. तपासासाठी एक पोलिसांचे पथक तयार केले असून सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. मुलीला वैद्यकीय तपासणी पाठवले असून पोलिस अहवालाची वाट पाहत आहेत. लवकरच तिचा दंडाधिकारी जबाब घेतील. (Gaziyabad gang rape)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00