भारताच्या पोरींची कमाल; पाकिस्तानचा उडवला धुव्वा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. या सामन्यानंतर आज (दि.६)झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर ६ विकेट राखून दणदणीत  विजय मिळवला. या विजयासह भारताने स्पर्धेत पुनरामन केले आहे. हा सामना दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. (IND W vs PAK W)

भारतीय संघाने ICC महिला टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये पहिला विजय मिळवला. आज (दि.६) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय संघासमोर विजयासाठी १०६ धावांचे लक्ष्य होते. हे आव्हान भारतीय संघाने १९व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पूर्ण केले. भारतीय संघाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून ५८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय संघ आता ९ ऑक्टोबरला (बुधवार) आपल्या पुढील सामन्यात श्रीलंकेशी भिडणार आहे.

पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. १८ धावांवर स्मृती मानधना बाद झाली. स्मृतीला सादिया इक्बालने बाद केले. यानंतर शेफाली वर्मा आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांनी डावाची धुरा सांभाळत दुसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी रचली. पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने जेमिमाला बाद करत ही जोडी फोडली. यानंतर फातिमाने भारताची यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोषला (०) बाद केले.

पाठोपाठ विकेट पडल्यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी भागिदारी रचत भारतीय संघाला विजयाच्या जवळ नेले. मात्र, भारताला विजयासाठी दोन धावांची गरज असताना हरमनप्रीत कौर दुखापतीमुळे निवृत्त झाली. हरमनप्रीत कौरने २४ चेंडूत २९ धावा केल्या. यानंतर दीप्ती शर्मा आणि सजना सजीवन यांनी भारताच्या विजयावर शिक्का मोर्तब केले.तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात खराब झाली. सामन्याच्या पहिल्याच षटकात गुल फिरोझाच्या रूपात पाकिस्तानचा पहिला फलंदाज बाद झाला. तिला भोपळा न फोडता तंबूत परतली. यानंतर सिद्रा अमीन अवघ्या ८ बाद करून झाली. तर ओमाम्मा सोहेल १२ करून बाद झाली.

त्यानंतर मुनिबा अली १७ धावांचे योगदान देवून बाद झाली. त्यामुळे पाकिस्तानने अवघ्या ४१ धावांत आपले ४ फलंदाज गमावले. मुनिबाच्या रूपात पाकिस्तानचा पाचवा फलंदाज बाद झाला. तर, कर्णधार फातिमा सना १३ धावा करून तंबूत परतली. तुबा हसन ० धावांवर माघारी फिरली.
यानंतर निदा दार आणि सय्यदा अरुब शाह यांनी आठव्या विकेटसाठी २८ धावांची भागीदारी केली. या खेळीमुळे पाकिस्तानने १०० धावांचा टप्पा पार केला. पाकिस्तान २० षटकात ८ विकेट गमावून १०५ धावा केल्या. निदा दारने सर्वाधिक २८ धावांची खेळी खेळली. गोलंदाजीमध्ये भारताकडून अरुंधती रेड्डीने तीन बळी घेतले. तर श्रेयंका पाटील यांना दोन यश मिळाले.

हेही वाचा :

Related posts

Indian women’s win : भारताचा मोठा विजय

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!