वनडे मालिका ऑस्ट्रेलियाच्या खिशात

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३७२ धावांचा आव्हान पाठलाग करणाऱ्या भारताचा डाव ॲनाबेल सदरलँडच्या गोलंदाजीमुळे २४९ धावांवर आटोपला. तिने ३९ धावा देत भारताचे चार फलंदाज बाद केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन वन-डे सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. (IND W v AUS W)

ऑस्ट्रेलियाने सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फोबी लिचफिल्ड (६०) आणि वॉल या सलामीच्या जोडीने १३० धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर वॉलने पॅरीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. वॉल बाद झाल्यानंतर पॅरीने आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली आणि बेथ मुनी (५६) सोबत ९८ धावांची भागीदारी केली. गोलंदाजीमध्ये सायमा ठाकोरने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तिच्यासह मिन्नू मणी २, तर रेणुका सिंग, दीप्ती शर्मा, प्रिया मिश्रा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने सुमार कामगिरी केली. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या ऋचा घोषने ७२ चेंडूत ५४ धावा केल्या. तिच्यासह जेमिमाह रॉड्रिग्ज (४३) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (३८) यांना आपल्या खेळीचे मोठ्या डावात रूपांतर करण्यात अपयशी ठरल्या. मिन्नू मणीने शेवटच्या षटकांमध्ये ४५ चेंडूत नाबाद ४६ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून ॲनाबेल सदरलँडने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या तिच्यासह मेगन शुट, किम गर्थ , ऍशलेह गार्डनर, सोफी मोलिनक्स आणि अलाना किंग यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. (IND W v AUS W)

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत