पहिल्या दिवसा अखेर ऑस्ट्रेलिया एक बाद ८६

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून सुरू झाला.हा कसोटी सामना डे-नाईट खेळवण्यात आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात भारताचा डाव १८० धावांत आटोपला. यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिला दिवसाचा खेळ संपेपर्यंत एक फलंदाज गमावून ८६ धावा केल्या. (IND vs AUS Test)

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील दुसरा सामना अॅडलेड स्टेडियमवर डे-नाईट खेळवण्यात येत आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव १८० धावांत आटोपला. फलंदाजीत नितिश रेड्डीने सर्वाधिक ४२ धावा केल्या. तर, के.एल. राहूलने ३७ धावांची खेळी केली. यासह शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी चांगली भागीदारी रचली. गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या. अशी कामगिरी त्याने १५ वेळी केली.

भारताने दिलेल्या आव्हानचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत एक फलंदाज गमावून ८६ धावा केल्या. उस्मान ख्वाजाच्या (१३) रूपात ऑस्ट्रेलियाचा एक फलंदाज बाद झाला. त्याला भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रोहित शर्माकरवी झेलबाद केले. सध्या मार्नस लॅबुशेन (२०) आणि नॅथन मॅकस्वीनी (३८) खेळत आहेत. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागिदारी रचली आहे.

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत