हिवाळ्यातही त्वचा तजेलदार कशी ठेवाल

थंडीचे दिवस आता सुरू होतील. पाऊस आणि हिवाळ्याच्या दरम्यानचा संक्रमणवेळ आरोग्यासाठी खूपच आव्हानात्मक असतो. हिवाळ्याचे दिवस सुरू झाले, की सुरुवातीला अॅडजस्ट व्हायला खूप वेळ लागतो. किंबहुना खूपच त्रासदायक ठरते. त्यामुळे आपली चिडचिड होते. त्यातच त्वचा तडकणे, ओठ फुटणे असे प्रकार सुरू होतात. त्यामुळे चिडचिडीत अधिकच भर पडते. या परिस्थितीत आपल्या त्वचेची कांती नीट ठेवण्यासाठी काही उपाय जरूर करावेत.

थंडीच्या दिवसांत तापमानात घट होते, आर्द्रताही कमी असते. त्यातच कधीकधी जोराचा गार वारा सुटतो. या सर्वांचा आपल्या त्वचेवर लक्षणीय परिणाम होतो. त्वचा कमालीची कोरडी होते. त्वचा फाटते किंवा तडकते, खाज सुटते. व्यक्तिपरत्वे इतरही समस्या उद्भवू शकतात. हिवाळा ऋतूचा तुमच्या त्वचेवर कसा परिणाम होतो हे समजून घेतले पाहिजे. ते दुष्परिणाम टाळण्यासाठी योग्य औषधे किंवा प्रसाधने निवडणे गरजेचे असते. विशेष म्हणजे आरोग्यदायी सवयी अंगीकारण्यापासून ते संपूर्ण हिवाळ्यात तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी कशी राहील, ते पाहिले पाहिजे.

हिवाळ्याचा तुमच्या त्वचेवर कसा परिणाम होतो हे समजून घ्या. स्कीनकेअर टिप्समध्ये जाण्यापूर्वी, हिवाळा त्वचेसाठी इतका कठीण आणि त्रासदायक का ठरतो, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

कोरडी हवा आणि कमी आर्द्रता

विशेषत: ज्या भागात थंड किंवा कडक हिवाळा असतो तेथे हवा जास्त कोरडी असते. कमी आर्द्रता म्हणजे तुमच्या त्वचेतील ओलावा लवकर कमी होतो. लवकरात लवकर बाष्पीभवन होण्याच्या प्रक्रियेमुळे त्वचा कोरडी, ऱ्हाट आणि निस्तेज होते. त्वचेतील ओलाव्याच्या कमतरतेमुळे फ्लिकनेस, क्रॅक आणि पोतही खडबडीत होऊ शकतो. घरातील वातावरण ऊबदार असते. बाहेर मात्र थंड हवा असते. हे बदलते वातावरणही तुमच्या त्वचेवर परिणाम करते. शिवाय घर किंवा ऑफिसातील इनडोअर हीटिंग सिस्टमचाही त्वचेवर असाच परिणाम होऊ शकतो.

अतिरिक्त एअर हीटिंग सिस्टम

 रेडिएटर्स आणि स्पेस हीटर्स हवेतील आर्द्रता कमी करतात, वातावरणात कोरडेपणा राहतो. त्यामुळे त्वचेची हायड्रेशन पातळी कमी होते. वारा आणि थंड हवा हिवाळ्यातील कोरडेपणाचा प्रभाव वाढवू शकतात. त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेलाची पातळी कमी होते. त्वचेवरील कोरडेपणामुळे ती अधिक संवेदनशील बनते आणि दाहही सुरू होतो. त्यामुळे चिडचिड होते. थंड तापमानात योग्य काळजी न घेता दीर्घकाळापर्यंत राहिल्याने ओठ फाटणे,  त्वचेला भेगा पडणे आणि काही वेळा जखमाही होऊ शकतात.

सूर्यप्रकाशाचा अभाव

हिवाळ्यात दिवस लहान असतो. त्यामुळे साहजिकच सूर्यप्रकाश कमी मिळतो. त्याचा परिणाम व्हिटॅमिन डी पातळी कमी होण्यावर होतो. अंतिमत: त्वचेच्या नैसर्गिक तेजावरही परिणाम होतो. तथापि, कमी थेट सूर्यप्रकाश असला तरी, हिवाळ्याच्या दिवसांत सनस्क्रीन वापरणे महत्त्वाचेच आहे.  कारण अतिनील किरणांचा त्वचेवर थेट परिणाम होतो. त्यामुळेही नुकसान होऊ शकते.

आहार आणि जीवनशैलीतील बदल

हिवाळ्याचा ऋतूमध्ये आहारात बदल करणे गरजेचे आहे. भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. बऱ्याचदा आपण अधिक समृद्ध, जड पदार्थ खातो आणि पाणी मात्र कमी पितो. त्यामुळे त्वचेच्या आणि एकूण आरोग्यावरही परिणाम होतो. याव्यतिरिक्त, बराच वेळ घरात जातो, शारीरिक हालचाल कमी होते. त्यामुळेही मुरुम येणे किंवा निस्तेजता, अशा समस्या उद्भवू शकतात.

या सर्व परिस्थितीचा योग्य मुकाबला करण्यासाठी समतोल आहार, फलाहार, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्कीन केअर औषधे आणि सौंदर्य प्रसाधनाचा वापर करणे आवश्यक आहे.

Related posts

lead in turmeric : तुम्ही वापरताय ती हळद रंग तर नाही ना?

ganga and cancer: गंगेच्या पठाराला कॅन्सरचा घट्ट विळखा!

संतुलित आहार आणि आरोग्य