रूटला मागे टाकत ब्रुक अव्वलस्थानी

दुबई : इंग्लंडचा शैलीदार फलंदाज जो रूटला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतील अग्रस्थान गमवावे लागले आहे. इंग्लंडच्याच हॅरी ब्रुकने संघसहकारी रूटला एका गुणाने मागे टाकत या क्रमवारीत अग्रस्थान पटकावले आहे.  (Harry Brook)

आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत ब्रुक ८९८ गुणांसह पहिल्या, तर रूट ८९७ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. ब्रुकने २०२४ मध्ये ११ सामन्यांत ६१.०५च्या सरासरीने १०९९ धावा केल्या असून त्यामध्ये ४ शतकांचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटीत सामनावीर ठरलेल्या ब्रुकने पहिल्या डावात शतक झळकावले होते. याच कसोटीच्या दुसऱ्या डावात  रूटने वर्षातील सहावे आणि कारकिर्दीतील ३६ वे कसोटी शतक झळकावले.  (Harry Brook)

क्रमवारीत तिसऱ्या स्थानावरील न्यूझीलंडच्या केन विल्यमसनच्या खात्यात ८१२ गुण असून भारताचा यशस्वी जैस्वाल ८११ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. यशस्वीशिवाय भारताच्या केवळ रिषभ पंतला आघाडीच्या दहा फलंदाजांमध्ये स्थान मिळवता आले असून तो ७२४ गुणांसह नवव्या स्थानावर आहे. दरम्यान, अडलेड कसोटीत भारताविरुद्ध शतक झळकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडने क्रमवारीत ७८१ गुणांसह पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.

कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये भारताच्या जसप्रीत बुमराहने ८९० गुणांसह पहिले स्थान पटकावले आहे. भारताचे रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे गोलंदाजही या क्रमवारीत अव्वल दहामध्ये आहेत. अश्विन ७९७ गुणांसह पाचव्या, तर जडेजा ७८६ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. अष्टपैलू कसोटीपटूंच्या क्रमवारीमध्ये जडेजा ४२३ गुणांसह अव्वलस्थानी असून तिसऱ्या स्थानावरील अश्विनच्या खात्यात २९० गुण आहेत.

 

https://www.relianceiccrankings.com/ranking/test/batting/

हेही वाचा : 

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील तिसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल

१६ वर्षांनी न्यूझीलंडमध्ये इंग्लंडने जिंकली कसोटी मालिका

 

 

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!